Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक सध्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळतय. अरुंधतीचा (Arundhati) मुलगा यश सध्या वेगळ्या संकटात अडकलाय. त्यामुळे देशमुख कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे. मात्र या सगळ्यात अरुंधती म्हणजे आई मात्र कुठे दिसत नाही. मालिकेच्या (series) ट्रॅकमध्ये अरुंधतीही गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी वर्ल्ड टूरवर असल्याचं सांगण्यात आले आहे. मात्र अरुंधती नेमकी आहे तरी कुठे? हे नुकतच सोशल मिडीयावरुन (Social media) समोर आले आहे.
अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Actress Madhurani Prabhulkar) सध्या ऑस्ट्रेलिया टूरवर आहे. आपल्या मुलीसोबत ती ऑस्ट्रेलियाची सफर करत आहे. शिवाय त्याचं कारणही नुकतच समोर आले आहे. मधुराणीचा कवितेचं पान हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. सिडनीत राहणाऱ्या एका चाहत्याला मधुराणीचा हा कार्यक्रम तिथे करायचा होता. आणि म्हणून हा कार्यक्रम तिथे सादर करण्यासाठी मधुराणी मुलीसोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.
या निमित्ताने सातत्याने सुरु असलेल्या रुटीनमधूनही ब्रेक मिळाल्याचं मधुराणी सोशल मिडीया पोस्टमध्ये लिहीत आहे. मधुराणी पोस्टमध्ये लिहीते की, “गेल्या ३ वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झाले आहे. ७ ते ८ दिवस मुंबईत शूट करायचं आणि २ ते ३ दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये…. long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं, हो…गेल्या ३ वर्षात सलग असे ८ ते १० दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं.. आणि खूप सारा ताण असतो.
माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिपची ही संधी चालून आली. या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमानाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला ‘मी तुझ्या ‘कवितेचं पान’ चा मोठा फॅन आहे…इथे काही कवी आहेत…तुझा एपिसोड इथे करता येईल का ? ‘ मी म्हंटलं, ‘ मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते’ त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं… ‘आई… ‘च्या टीमने पण प्रंचड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली.
राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले
अनेक एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरलीच ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली. आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्समुळे… उमेश- गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव. आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ यांनी तर एन्जॉय पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली , खरंतर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं.. सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचे आहे.
त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणे इतकं सोपं नाही हो…त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असच म्हणायला हवं…सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वरालीला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादा सुद्धा…!!”
ऑस्ट्रेलियात मुलीसोबत जाण्याचा योग मधुराणीकडे चालून आला शिवाय यानिमित्ताने मुलीसोबतही छान वेळ घालवता आला आहे. देशाबाहेरील या ट्रीपमुळे छान प्रवासही घडून आल्याचं दिसत आहे. दोघी मायलेकींनी या ट्रीपचा मनमुराद आनंदही लुटला आहे. तेव्हा लवकरच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत आई कधी परत येतेय याची मात्र प्रेक्षक वाट पाहत असतील एवढं नक्की…