Download App

Box Office : पहिल्याच दिवशी भाईजानच्या ‘टायगर-3’ चा छप्परफाड कमाई; ‘इतके’ कोटी कमवत कमबॅक

Tiger 3 Box Office Collection: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) यांचा टायगर-3 (Tiger 3) हा सिनेमा काल (12 नोव्हेंबर) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक चाहत्यांनी बघितला आहे. अनेकांनी या सिनेमाचा रिव्ह्यू देखील सोशल मीडियावर शेअर केला. टायगर-3 हा सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असणार आहे. आता भाईजानच्या या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.


टायगर-3 या सिनेमा रिलीज होण्याआधीच जोरदार चर्चा रंगली होती. या सिनेमात टायगरच्या भूमिकेमध्ये भाईजान आणि झोयाच्या भूमिकेत कतरिना कैफला पुन्हा एकदा बघण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे बघायला मिळत होत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘टायगर 3’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 43 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.

टायगर-3 या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं 43 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तेलगूमध्ये या सिनेमाने 15 कोटी रुपये कमावले आहे. सिनेमाच्या तमिळ व्हर्जननं 15 लाख रुपयांचा गल्ला कमावला आहे. ‘टायगर 3’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या सिनेमाने ओपनिंग-डेला सनी देओलच्या ‘गदर 2’ या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘टायगर 3’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे, तर ‘गदर 2’ची पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर

प्रेक्षकांना टायगर 3 सिनेमा 3 प्रकारांत पाहायला मिळाला आहे. प्रेक्षक हा सिनेमा प्रीमियम फॉरमॅटमध्येही पाहु शकणार आहेत. यामध्ये यशराज फिल्मने 2D, IMAX 2D, 4dx 2d, PVR P[XL] , dbox, 4DE मोशनमध्येही हा सिनेमा पाहायला मिळत आहे. दरम्यान, टायगर 3 हा चित्रपट फक्त हिंदीतच नाही तर तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us