Download App

Uorfi Javed: हाय गर्मी! शिंगे असलेली ब्रा ठिक होतं पण आता पँटचं बटन उघडं, उर्फीने वाढला इंटरनेटचा पारा

Uorfi Javed: उर्फी जावेद हे (Uorfi Javed) कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. इतकेच नाही तर थेट उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. नुकताच उर्फी जावेद हिने काही फोटो शेअर (Share photos) केले आहेत.


उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोंमुळे इंटरनेटचा (Internet) पारा चांगलाच वाटल्याचे बघायला मिळत आहे. (Bold Look ) उर्फी जावेद हिने लाल रंगाची ब्रॅलेट घातल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या ब्रॅलेटला पुढे शिंगे असल्याचे बघायला मिळत आहे. काळ्या रंगाची पॅंट देखील तिने घातली असून त्याचे बटन खुले सोडल्याचे दिसत आहे.

या लूकमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. उर्फी जावेद ही तिच्या या नव्या लूकमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे देखील बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्या या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. नेहमीच तिच्यावर टीका देखील होते.

उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, शेमलेस. दुसऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले आहे की, मुलींना हे पाहून लाज वाटली पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, ही उर्फी जावेद नेमकी कशासाठी कपडे घालते? हिला असेही अंग प्रदर्शन करायचे असते. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे कायम वादात अडकत असते.

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या बायकोसोबतचा फोटो, म्हणाले…

आता या व्हिडीओमुळे उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका ही केली जात आहे. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात की टीव्ही मालिकांनी केली होती. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र उर्फी जावेद हिला खरी ओळखी ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिचे सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Tags

follow us