Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या बायकोसोबतचा फोटो, म्हणाले…

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या बायकोसोबतचा फोटो, म्हणाले…

Ashish Vidyarthi: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. २५ मे रोजी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्याशी लग्न करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या बायको (Second wife) सोबतचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Vidyarthi Avid Miner (@ashishvidyarthi1)


आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दुसरी बायको रुपाली बरुआ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे की, या पोस्टमध्ये आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या बायकोचा मैत्रीण म्हणून उल्लेख केला आहे. या फोटोला त्यांनी “प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद मित्रा…अलशुकरण बंधू, अलशुकरण जिंदगी,” असं कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, आशिष विद्यार्थींनी ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याने त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षात दुसरं लग्न करण्याचं निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी सांगितले होते. आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या बायकोचे नाव राजोशी उर्फ पिलू बरुआ असून या दोघांना अर्थ नावाचा २२ वर्षांचा मुलगा देखील आहे. गेल्यावर्षी त्यांनी पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतला होता.

Tamannaah Bhatia: विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाने मोडला 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम

आशिष विद्यार्थी यांची बायको रुपाली बरुआ या आसामच्या आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्या कार्यरत आहे. कोलकाता येथे त्यांच्या मालकीचं फॅशन स्टोर आहे. आशिष विद्यार्थी यांनी तमिल, मल्याळम, कन्नड अशी ११ हून अधिक भाषांमध्ये काम केलं आहे. जवळपास २०० चित्रपटांत ते झळकले आहेत. ‘बिच्छू’, ‘अर्जुन पंडित’, ‘जिद्दी’, ‘बादल’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेला व्हिलन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube