Download App

25 वर्षांच्या सोहळ्याला एक दिवस थोडीच पुरणार! झी मराठी अवॉर्ड्स 2024; ‘या’ दिवशी होणार मोठ्ठं सेलिब्रेशन

Zee Marathi Awards 2024 : मनोरंजनसृष्टीत (Zee Marathi Awards 2024) सर्वत्र पसरलेल्या या बड्या नावांचं सांक्षिप्त रूपात वर्णन म्हणजे, “गोष्ट साांगणारा माणूस”. या गोष्ट सांगणाऱ्या माणसाच्या गोष्टीची सुरुवातच कवितेपासून झाली. रंगमंच, टेलिव्हीजन आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही क्षेत्रात स्वैर मुशाफिरी करणाऱ्या, लेखक, दिग्दर्शक निर्माता, गीतकार, आणि अभिनेता या सगळ्याच क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या अवलियाचं अजूनही हेच म्हणणं आहे की, “मोठेपणी काय व्हायचंय ते अजूनही ठरतंय.” आईचा रंगा, मुलांचा मित्र, नातवाचा गोष्ट सांगणारा आजोबा आणि मनोरंजन विश्वातलं एक हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्रीरंग गोडबोले (Shrirang Godbole).

‘घनसावंगी’वरून महायुतीत पेच कायम; अजित पवार गटाचा दावा, शिंदेंसेनेत प्रवेश केलेल्या उढाणेंची गोची होणार?

वडिलांच्या शब्दाचा मान ठेऊन श्रीरंग गोडबोले अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाले. पण नाट्यविश्वाशी जोडल्या गेलेल्या तारेमुळे शिक्षण आणि छंद या दुहेरी भूमिकेत मोठी तारेवरची कसरत झाली. त्यांच्यातल्या कलावंताने कलाक्षेत्रात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
नाटकात अभिनेता म्हणून सुरु झालेल्या प्रवासाची गाडी पुढच्या काही काळातच लिखाणाच्या स्टेशनवर येऊन थांबली. पुढे दिग्दर्शन, गीतलेखन, निर्मिती अशी अनेक स्थानक घेत संस्मरणीय प्रवास अधिक रोमांचित (Zee Marathi Awards Date) झाला. मनात असलेल्या, मनाला बोचालेल्या गोष्टी, परिणामांना न घाबरता निर्भीडपणे मांडण्याचा यांचा स्वभाव. या बेधडक स्वभावामुळे अनेकदा संकटांना सामोरं जावं लागलं. काय “घडलांय काय बिघडलंय ” याला न जुमानता फॉर या चेंज म्हणून त्यांनी आलेल्या संकटांवर गोष्टी रचायला सुरवात केली.

इंदू आणि फंट्या गँगने सजवला दिवाळीचा किल्ला! ‘इंद्रायणी’ मालिकेत बच्चे कंपनीची मोठी धमाल

आपल्यातल्या गोष्टींचा खजिना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इंडियन मॅजिक आय’ या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती झाली. रत्नाकर मतकरी यांचं ‘पिंपळपान’ घरोघरी पोहोचलं. राधा घना यांच्या प्रेमाची गोष्ट लोकांनी डोक्यावर घेतली. शब्दांना प्रभुत्व प्राप्त करून देणाऱ्या या शब्दांच्या जादूगाराने अनेक सुप्रसिद्ध गाणी आपल्या जादुई शब्दांनी अजरामर केली. झी मराठीच्या अनेक मालिकांसाठी “एकापेक्षा एक” गाणी रचण्याचा पराक्रम या जादूगाराने केला. सन्मान सोहळ्यांच्या सन्मान वाढवणारा हा अवलिया मनाला संतुष्ट करतील, असे गाण्यांचे बोल आणि डोळ्यांची पारणे फेडतील असे सन्मान सोहळे या माणसाने घडवले आहेत.

सन्मान सोहळे म्हटल्यावर डोळ्याांसमोर येणारं पहिलं नाव म्हणजे श्रीरंग गोडबोले. झी मराठी वाहिनीशी यांचं नातं अगदी सुरुवातीपासूनच जोडलं गेलं. मोठ झाल्यावर यांच्यासारखं व्हायचंय असं एका पिढीला वाटत असताना या माणसाचं कायम हेच म्हणणं असतं, की “मोठं झाल्यावर काय व्हायचं? ते यांच अजूनही ठरतंय”. या वर्षीचा झी मराठी अवॉर्ड्स 2024 हा खऱ्या अर्थाने अनेक सर्प्राइझेसने भरलेला असणार आहे. 25 वर्षांच्या सोहळ्याला एक दिवस थोडीच पुरणार. 26 आणि 27 ऑक्टोबरला मोठं सेलिब्रेशन होणार आहे. तेव्हा पाहायला आणि घरबसल्या अनुभवयाला विसरू नका, हा भव्य सोहळा फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.

follow us