‘घनसावंगी’वरून महायुतीत पेच कायम; अजित पवार गटाचा दावा, शिंदेंसेनेत प्रवेश केलेल्या उढाणेंची गोची होणार?

‘घनसावंगी’वरून महायुतीत पेच कायम; अजित पवार गटाचा दावा, शिंदेंसेनेत प्रवेश केलेल्या उढाणेंची गोची होणार?

Ghansawangi Constituency Ajit Pawar Vs Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. यादरम्यान जालन्यातून मोठी बातमी समोर येतेय. घनसावंगी मतदारसंघात महायुतीत (Mahayuti Crisis) जागेवरून पेच अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून या जागेवर (Ghansawangi Constituency) दावा करण्यात आलाय. त्यामुळे नुकतंच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या हिकमत उढाण यांची गोची होण्याची शक्यता आहे. घाटगे अजित पवार गटात (Ajit Pawar) गेल्याने भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत अद्यापही पेच कायम असल्याचं बघायला मिळतोय. महायुतीत ही जागा परंपरागत शिवसेनेची (Maharashtra Assembly Election) आहे. त्यातच महायुतीत अजित पवार गट आल्यानं या जागेवर अजित पवार गटानेही दावा केला आहे. उमेदवारी मिळावी म्हणून उबाठा गटातून हिकमत उढाण यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तर भाजपचे सतीष घाटगे यांनी या जागेवर दावा करत सर्वांनाच आव्हान दिलं होतं.

राजकारणातले सर्वच पुतणे काकांचं ऐकत नाही; अजितदादा, धनुभाऊंचा उल्लेख, भुजबळांची फटकेबाजी

मात्र अजित पवार यांनी या जागेवर दावा करत भाजपच्या सतीष घाटगे यांना तडकाफडकी मुबंईत बोलावून या जागेवर दावा केल्याने सतीष घाटगे हे भाजपमधून अजित पवार गटात जाण्याची शक्यता असून लवकरच याचा निर्णय जाहीर होणार आहे. मात्र, या जागेवरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय. आज या जागेवरचा तिढा सुटेल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांच्या विरुद्ध घाडगे की उढाण? असा प्रश्न मात्र सध्या तरी कायम आहे.

“समोर कुणीही असो जनतेचं ठरलंय..” वडगाव शेरीत बापूसाहेंबानी टिंगरेंना ललकारलं

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राजेश टोपेंच्या कुटुंबियांचे वचर्स्व आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता येथील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे आता घनसांगवीमध्ये महायुती नेमकं कोणत्या शिलेदाराला रिंगणात उतरवते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. घनसांगवी मतदारसंघामुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार का? याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube