Download App

डोनाल्ड ट्रम्प यांची अ‍ॅपल सीईओ टिम कुक यांना धमकी, भारतात उत्पादन IPhone वर लागणार 25% टॅरिफ

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात भूमिका घेत अ‍ॅपल सीईओ टिम कुक यांना धमकी दिली आहे. जर आयफोन

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताविरोधात भूमिका घेत अ‍ॅपल सीईओ टिम कुक (Tim Cook) यांना धमकी दिली आहे. जर आयफोन (iPhone) अमेरिकेऐवजी भारतात बनवले गेले तर त्यांच्या कंपनीला 25% टॅरिफ भरावा लागेल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल सीईओ टिम कुक यांना दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीनंतर प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये अ‍ॅपलचे शेअर्समध्ये 2.5 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे अमेरिकन स्टॉक इंडेक्स फ्युचर्समध्ये घसरण होताना दिसत आहे.

मी टिम कुक यांना खूप पूर्वीच कळवले आहे की, अमेरिकेत विकले जाणारे त्यांचे आयफोन भारतात किंवा इतरत्र नव्हे तर अमेरिकेत उत्पादित करणे मला अपेक्षा आहे. मात्र जर असं झाले नाहीतर अ‍ॅपलला किमान 25% टॅरिफ भरावा लागेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अ‍ॅपलने नुकतंच भारतात उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये आयफोनच्या अनेक मॉडेल्सचे उत्पादन आधीच सुरू करण्यात आले आहे. 2024-25 मध्ये भारतातील आयफोन उत्पादन 60% वाढून 1.89 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्याने याचा परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या टॅरिफमुळे पुरवठा साखळीच्या चिंता आणि आयफोनच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अ‍ॅपलने भारताला पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून म्हणून स्थान देत आहे, असा दावा रॉयटर्सने गेल्या महिन्यात केला होता.

Apple लॉंच करणार स्मार्ट ग्लास, बिल्ट-इन कॅमेरासह मिळणार जबरदस्त फीचर्स

follow us