Taiwan Earthquake : तैवानमध्ये गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठा भूकंप (Taiwan Earthquake) बुधवारी झाला. या भीषण भूकंपात आतापर्यंत एक हजारहून जास्त लोक जखमी झाले आहे तर माहितीनुसार, नऊ जणांचा या भूकंपामध्ये मुत्यू झाला आहे.
तर या भीषण भूकंपात एका महिलेसह दोन भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.2 होती तर अमेरिकेच्या सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी होती.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 70 जण इमारतींमध्ये अडकले असून सध्या त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे सध्या भूकंपाच्या केंद्राजवळील डोंगराळ प्रदेशात असलेल्या तसेच विरळ लोकसंख्या असलेल्या पूर्वेकडील काऊन्टीमधील झुकलेल्या इमारतींचे अनेक फोटो शेअर केले आहे.
तैवानमध्ये या भीषण भूकंपामुळे अनेक इमारती झुकल्या आहे. सरकारी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे 24 भूस्खलनाच्या घटना घडल्या असून 35 रस्ते, पूल आणि बोगद्यांचे नुकसान झाले आहे.
भारत तैवानच्या पाठीशी उभा आहे: पंतप्रधान मोदी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांनी या भीषण भूकंपामध्ये मुत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करत भारत या दुःखाच्या काळात तैवानच्या लोकांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.
त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, “तैवानमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे मला खूप दुःख झाले आहे.”
‘अलीबाबा चाळीस चोर’ला पायरसीचा फटका, मनसे नेत्यांची सायबर पोलिसांत तक्रार