MNS Leader Sandeep Deshpande : ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ला पायरसीचा फटका, मनसे नेत्यांची सायबर पोलिसांत तक्रार

  • Written By: Last Updated:
MNS Leader Sandeep Deshpande : ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ला पायरसीचा फटका, मनसे नेत्यांची सायबर पोलिसांत तक्रार

MNS Leader Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) निर्मित अलीबाबा आणि चाळीशीतले चोर (Alibaba aani calisitale chor) या मराठी चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी मोबाइलवर दिसत असल्याने चित्रपट निर्मात्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने या विरोधात संदिप देशपांडे, अभिनेते अतुल परचुरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मुंबई सायबर सेलकडे तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांची भेट घेऊन मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नुकताच अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पायरसीचा फटका बसला आहे. यामुळे अलीबाबा आणि चाळीशीतले चोर निर्माते आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसे शो मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

तर गेल्या काही वर्षात हा विषय आपण थांबवला होता. पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची पायरसी सुरू झाली आहे. अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाची देखील पायरसी झाली आहे. हा चित्रपट प्रत्येकाच्या मोबाइलवर पाठवला जात आहे. माझे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चित्रपट आणि मराठी नाटक हे चित्रपटगृहात जाऊन पहा. पायरेटेड सिनेमा मोबाइलवर येतो आहे म्हणून पाहू नका.

राज्यात पुन्हा एका मराठी चित्रपटावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाहीतर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशाराही दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज जाणीवपूर्वक मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज व्हावी म्हणून काही शक्ती काम करत आहे. ते लोक काहींना षडयंत्र वापरून मराठी चित्रपट चालू नयेत म्हणून काम करत आहे. या प्रकरणात तपास झाला पाहिजे आणि मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही या लोकांना शोधून त्यांना मनसेस्टाइल चांगला धडा शिकवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लंकेना शह देण्यासाठी अजित दादांचे शिलेदार विखेंच्या मैदानात

सेंसॉर बोर्डात अमराठी लोकांची भरती : खोपकर

मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मोठा आरोप करत सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यासाठी मराठी चित्रपटांना प्रचंड त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. आज सेन्सरशिपपासूनच मराठी चित्रपटांची गळचेपी सुरू होते. ज्यांना मराठी कळत नाही, मराठी समजत नाही असे लोक त्या सेंसॉर बोर्डात आहेत. यामुळे आम्ही लवकरच हे विषय घेऊन सरकारला माहिती देणार आहोत, असे खोपकर यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज