Taliban Ban On Women : गेल्या एक वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आहे. तालिबानच्या सत्तेनंतर येथील महिलांची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे. याआधी सत्तेत आल्यानंतर तालिबानी सरकारने महिलांच्या शिक्षणावर निर्बंध घातले होते. त्यानंतर आता सरकराने महिलांच्या खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
तालिबान सरकारने सोमवारी (10 एप्रिल) अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील बाग किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये कुटुंबे आणि महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मौलवींनी केलेल्या तक्रारीनंतर तालिबान सरकारने हा निर्णय घेतला आहे. हेरात प्रांतातील बाग किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिला-पुरुषांची गर्दी झाल्याचे मौलवींनी तक्रारीत म्हटले आहे.
हिजाब परिधान न केल्याने आणि स्त्री-पुरुष एकाच ठिकाणी असल्याने निर्बंध लादण्यात आल्याचे अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत, ही बंदी फक्त हेरात प्रांतातील रेस्टॉरंटना लागू असणार आहे. दरम्यान, हेरातमधील मंत्रालय आणि सद्गुण संचालनालयाचे उप अधिकारी बाज मोहम्मद नझीर यांनी सर्व रेस्टॉरंट कुटुंबे आणि महिलांसाठी मर्यादित नसल्याच्या मीडिया वृत्ताचे खंडन केले, ते म्हणाले की, आम्ही अशा गोष्टी पूर्णपणे नाकारतो. हे निर्बंध केवळ हिरवे क्षेत्र असलेल्या रेस्टॉरंट्सना लागू आहे.