काँग्रेसची अवस्था ही 400 वरुन 40वर, शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा
Eknath Shinde On Rahul Gandhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खारघर दौरा केला. यावेळी त्यांनी खारघर मधील सेंट्रल मैदानाची पाहणी केली. याच मैदानात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
तसेच यावेळी आपण मुख्यमंत्री असताना हा सोहळा पार पडत असल्याने आनंद व्यक्त केला. जवळपास 20 लाखांच्या वर श्री सदस्य उपस्थित राहणार असून त्याचाच आज आढावा घेतला व हा सोहळा व्यवस्थित आणि दिमाखात पार पडावा म्हणून प्रशासनाला सूचना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन जो वाद सुरु आहे त्यावर देखील भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवर बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. माणूस डिग्रीने मोठा होत नाही तर कर्माने मोठा होतो. देशाची आर्थिक व्यवस्था ढासळत असताना त्यांनी देशाला पुढे नेले. काश्मीरमधील 370 कोणी हटवला, अशा शब्दात त्यांनी मोदींची पाठराखण केली आहे.
कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
यावेळी त्यांनी राहुल गांधींवर देखील टीकास्त्र सोडले. तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करणारे राहुल गांधी पहिले,लोकशाही नाही म्हणता,मग लोकशाही नसती तर यांची जोडो की तोडो यात्रा झाली असती का, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसची अवस्था काय झाली चारशे वरून चाळीस वर आले,आता पुढे काय होईल बघा. हाती चले हजार कुत्ते भोके हजार अशी अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.