Malaysia Visa : ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षात तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी 1 डिसेंबरपासून भारतीय आणि चिनी नागरिकांसाठी 30 दिवसांचा व्हिसा-मुक्त प्रवेश (Visa free entry) जाहीर केला आहे. अलिकडच्या आठवड्यात थायलंड आणि श्रीलंका यांनीही पर्यटनाला चालना देण्यासाठी अशाच घोषणा केल्या. इब्राहिम म्हणाले की सध्या आखाती देश आणि तुर्की आणि जॉर्डनसह इतर पश्चिम आशियाई देशांमध्ये ही सुविधा आहे आणि आता ती भारत आणि चीनलाही दिली जाईल.
मलेशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘बरनामा’ने दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम यांनी असेही सांगितले की, व्हिसा माफीच्या वेळी कडक सुरक्षा तपासणी केली जाईल. इब्राहिम देशाचे अर्थमंत्री होते. पंतप्रधान म्हणाले, ‘मलेशियात येणाऱ्या सर्व पर्यटक आणि अभ्यागतांची प्राथमिक तपासणी केली जाईल. सुरक्षा ही वेगळी बाब आहे. जर एखाद्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असेल किंवा दहशतवादी धोका असेल तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही. हे सुरक्षा दल आणि इमिग्रेशनच्या अधिकारक्षेत्रात येते, असे पंतप्रधान म्हणाले.
Jhimaa 2 मध्ये ‘या’ पात्राला झालेला पार्किनसन्स आजार नेमका काय? जाणून घ्या…
मलेशियाला भारतीयांकडून उत्पन्नाची अपेक्षा
सध्या, आठ ASEAN (Association of Southeast Asian Nations) देशांना सामाजिक भेटी, पर्यटन आणि व्यावसायिक हेतूंसाठी मलेशियामध्ये 30 दिवसांचा व्हिसा-मुक्त प्रवेश मंजूर केला जात आहे. मलेशियाला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत भारत अव्वल देशांमध्ये आहे.
मलेशिया टुरिझम प्रमोशन बोर्डाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एकूण 3,24,548 भारतीय पर्यटक मलेशियामध्ये आले होते. त्यात म्हटले आहे की 2023 च्या पहिल्या तिमाहीत 1,64,566 भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली, गेल्या वर्षी याच कालावधीत 13,370 पर्यटक होते.
तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन
श्रीलंकेने भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंडसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश उपक्रम सुरू केला आहे, जो 31 मार्च 2024 पर्यंत लागू केला जाणार आहे. थायलंडनेही भारत आणि तैवानच्या लोकांना ही सूट दिली आहे, जी 10 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.
खरे तर मलेशियासह या देशांना त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे आणि त्यामुळेच भारतीय पर्यटकांनी त्यांच्या देशात यावे अशी त्यांची इच्छा आहे. आजकाल, भारतीय मोठ्या प्रमाणावर जगाचा प्रवास करत आहेत परंतु त्यांची आवडती ठिकाणे दुबई आणि मालदीव सारखी देश बनली आहेत. आता मलेशियाला भारतीयांना त्यांच्या देशात आमंत्रित करायचे आहे. कोरोनापूर्वी जास्त भारतीय मलेशियाला जायचे पण आता ही संख्या कमी झाली आहे.