Jhimaa 2 मध्ये ‘या’ पात्राला झालेला पार्किनसन्स आजार नेमका काय? जाणून घ्या…

Jhimaa 2 मध्ये ‘या’ पात्राला झालेला पार्किनसन्स आजार नेमका काय? जाणून घ्या…

Jhimaa 2 : ‘झिम्मा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अखेर ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) काल (24 नोव्हेंबरला) चाहत्यांच्या भेटीला आहे. हा चित्रपट आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा नवा दृष्टीकोन देतो. तर त्याच वेळी चित्रपटाला एक दुखःद वळण मिळत. ते म्हणजे चित्रपटातील एका पात्राला गंभीर असा पार्किनसन्स हा आजार होतो. त्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. की, हा आजार नेमका काय आहे? त्याबद्दल म्हणावी तेवढी जागरूगता निर्माण झालेली नाही. त्यामुळे आज आपण पार्किनसन्स (Parkinson’s) हा आजार नेमका काय आहे? त्याचे लक्षण काय? कारणं काय? हे जाणून घेऊ…

पार्किनसन्स हा आजार नेमका काय आहे?

सुरूवातीला पाहुयात पार्किनसन्स हा आजार नेमका काय आहे? हा एक पक्षाघातासारखा आजार आहे. यामध्ये असं रेडिएशन असतं जे शरीराला हादरे बसवून हात-पाय थरथरतात. समान्यतः हा आजार वयाच्या साठीनंतरच्या लोकांना होतो. मात्र अलिकडे लहान वयोगटामध्ये देखील हा आजार आढळून आला आहे. 1817 ला जेम्स पार्किनसन यांनी या आजाराचे वर्णन केले होते. तर दुर्देव असे आहे की, हा आजार पुर्णपणे बरा होत नाही. फक्त रूग्णाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे दरवर्षी या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी 11 एप्रिलला हा दिवस पार्किनसन्स दिवस म्हणून पाळला जातो.

लक्षणं आणि कारणं काय आहे?

आता पाहुयात या आजाराची लक्षणं आणि कारणं काय आहेत? हा आजार झालेल्या व्यक्तींच्या शरिरात कडकपणा येतो. शरीर थरथरत, हात-पाय सुन्न् पडणे, चालता न येणे, दैनंदीन कामांमध्ये संथपणा येणे. ही प्राथमिक तर पुढे आजार वाढल्यावर मानसिक समस्या निर्माण होतात,स्मृतीभ्रंश होतो,तीव्र चिंता वाटते. ही लक्षण दिसायला लागतात.

Rajasthan Elections : 0.74 टक्के मतदान ठरविणार राजस्थानचे राजकीय भविष्य? वाचा इनसाईड स्टोरी

तर पार्किनसन्स हा मेंदूचा डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. जो डोपामाईन नावाच्या रसायनाच्या कमतरतेमुळे होतो. अद्याप या आजाराचे नेमके कारण समोर आलेले नसले नाही. मात्र काही प्रकरणांमध्ये अनुवांशिकता, पर्यावरणातील विषारी घटक, किटकनाशकांचा वापर, हवेतील रसायन यामुळे पार्किनसन्स झाल्याचे निदान झाले आहे.

निदान आणि उपचार कसा केला जातो?

आता पाहुयात या आजाराचे निदान आणि उपचार कसा केला जातो? या आजाराचे निदान करण्यासाठी विशिष्ट चाचणी नाही. पण मेंदूचा एमआरआय आणि डोपा पीआटी स्कॅन केले जाते. ज्यामध्ये मेंदूतील डोपामाईनची पातळी मोजली जाते. कारण हा घटक पार्किनसन्स आजाराचा मुख्य घटक आहे.

12th Fail: दमदार कमाईनंतर ’12 वी फेल’चा जलवा; ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र प्रवेश

तर या आजाराच्या उपचारामध्ये लेव्हो डोपा या औषधांचा वापर केला जातो. त्यामध्ये डोपामाईनची संयुगं असतात.त्यामुळे मेंदूतील डोपामाईनची पातळी वाढते. या औषधालाअनेक रूग्णांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. परंतु काही रूग्ण याला अपवादही ठरतात. त्यांना या औषधांचा काहीही फरक पडत नाही. उलट स्थिती आणखी खालावते.

तर अशा औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रूग्णांची स्थिती 8-10 वर्षांच्या उपचारांनंतर होते. त्यांच्यावर डीप ब्रेन स्टिम्युलेशन या पद्धतीने उपचार केले जातात. ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. तेवढीच महाग देखील आहे. मात्र ही उपचार पद्धती तरूणांमध्ये प्रभावी ठरली आहे. मात्र ज्या रूग्णांना पार्किनसन्स प्लस ही स्थिती असते ते रूग्ण दोन्ही उपचार पद्धतीला प्रतिसाद देत नाहीत. तर हा आजार रोग प्रतिकारक शक्तीशी संबंधित नाही. तसेच नियमित व्यायाम, श्वासोच्छवासाचे व्यायाम, चांगली जीवनपद्धती, सवयी आणि सकस आहारामुळे हा आजार वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. असं तज्ज्ञ सांगतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube