Download App

पाकिस्तानला झटका, चीनी कंपन्यांना दणका; अमेरिकेने ‘या’ प्रोजेक्टवर केली मोठी कारवाई

पाकिस्तानच्या मिसाइल प्रोजेक्टसाठीच्या पुरवठ्यात सहभागी असणाऱ्या चीनी कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी घालण्यात आली आहे.

Pakistan Missile Project : पाकिस्तानला धक्का देणारी बातमी समोर (Pakistan News) आली आहे. अमेरिकेनेच पाकिस्तानला हा धक्का दिला आहे. अमेरिकी विदेश विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की अमेरिकेचे कठोर धोरण कायम आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोजेक्टसाठी चीनकडून (China) मिळणाऱ्या मदतीवर बंदी आणली आहे. पाकिस्तानच्या मिसाइल प्रोजेक्टसाठीच्या पुरवठ्यात सहभागी असणाऱ्या चीनी कंपन्यांवर ही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या या कारवाईवर पाकिस्तानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा 

अमेरिकी विदेश विभागाने पाकिस्तानच्या मिसाइल प्रोजेक्ट आणि प्रौद्योगिकीच्या प्रसारात गुंतलेल्या पाच चीनी कंपन्या आणि एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार बीजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्रीचा समावेश आहे. ही कंपनी संहारक शस्त्रे आणि त्यांच्या वितरणाच्या साधनांवर काम करते.

या कंपनीन शाहीन 3 आणि अबाबिल प्रणालीशी संबंधित उपकरणांसाठी पाकिस्तानची मदत केल्याचे मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. या कंपनीने पाकिस्तानी मिसाइल प्रोजेक्टसाठी रॉकेट मोटर्सच्या परीक्षणासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी पाकिस्तानबरोबर काम केले. अमेरिकेने या कंपनीसह चीनच्या हुबेई हुआचांगडा इंटेलिजंट इक्विपमेंट कंपनी, युनिव्हर्सल एंटरप्राइज आणि शिआन लाँगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनीसह पाकिस्तानस्थित उपकरणांवर बंदी घातली आहे. यामध्ये एक चीनी नागरिकाचाही समावेश आहे. चीनला उपकरणे पोहोचवण्यात या व्यक्तीने मदत केली असा आरोप या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेच्या या कारवाईवर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली नसली तरी चीन मात्र खवळला आहे. चीनने या कारवाईचा तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेतील चीनी दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यू म्हणाले, अशा प्रकारच्या एकतर्फी प्रतिबंधांचा चीन विरोध करतो. अशा प्रतिबंधांना आंतरराष्ट्रीय कायदे किंवा युएस सुरक्षा परिषदेच्या प्राधिकरणात कोणताही आधार नाही.

पाकिस्तानला मिळालं काळ्या सोन्याचं घबाड पण, समोर आलं ‘हे’ संकट.. वाचा, काय घडतंय शेजारी?

follow us