Attack On Hospital In Sudan 70 People Killed : सुडानच्या (Sudan) अल फशर शहरातील हॉस्पिटलवर मोठा हल्ला (Attack On Hospital In Sudan) झाला. या हल्ल्यात सुमारे 70 लोक ठार झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सोशल प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ही माहिती (Sudan Attack) दिली.
सुदानमधील अल फाशर शहरातील हॉस्पिटलवर झालेल्या भीषण हल्ल्यात 70 जणांना जीव गमवावा लागला तर 19 जण गंभीर जखमी झाले. या वेदनादायक घटनेची माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस अधानोमम्हणाले की, हा हल्ला सौदी टीचिंग मॅटर्नल हॉस्पिटलवर झाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टद्वारे त्यांनी या घटनेची माहिती दिलीय. हल्ल्याच्या वेळी रुग्णालय उपचार घेणाऱ्या रुग्णांनी खचाखच भरले होते.
सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा
हल्ला झाला त्यावेळी रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी होती. अनेक जखमींवर जवळच्या इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र वैद्यकीय सुविधांअभावी उपचार अवघड होत आहेत. रुग्णालयात महिला आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने असल्याने हा हल्ला आणखीनच गंभीर झाला.
The appalling attack on Saudi Hospital in El Fasher, #Sudan, led to 19 injuries and 70 deaths among patients and companions. At the time of the attack, the hospital was packed with patients receiving care.
The attack comes at a time when access to health care is already…
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) January 25, 2025
स्थानिक अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी बंडखोर संघटना ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ)ला जबाबदार धरले आहे. मात्र, आरएसएफने हे आरोप फेटाळून लावले असून हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सैन्य आणि आरएसएफ यांच्यातील अलीकडील वाढत्या संघर्षाने हा हल्ला झाला. लष्करप्रमुख जनरल अब्देल-फताह बुरहान यांच्या नेतृत्वाखालील सुदानी सैन्याने अनेक भागात आरएसएफला माघार घ्यायला लावली होती.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत संदिप क्षीरसागरांचा मोठा दावा; म्हणाले, वाल्मिक कराड…
सुडानमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मानवतावादी संकट सतत गहिरे होत आहे. हे संकट रोखण्यासाठी अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय शक्ती अनेक प्रयत्न करत आहेत. यूएसने आरएसएफवर नरसंहाराचा आरोप केलाय. या गटावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी असंही सांगितलं की, सुदानमधील परिस्थितीबद्दल अचूक माहिती देणं खूप कठीण आहे.