सुदानमध्ये ओपन मार्केटवर भीषण हल्ला; तब्बल 54 लोकांचा मृत्यू, 158 जखमी
Sudan Attack : सुदानमधून अतिशय धक्कादायक बातमी (Sudan Attack) समोर आली आहे. सुदान सैन्याच्या विरोधात लढाई लढत असलेल्या अर्धसैनिक ग्रुरप ओमदुरमानने येथील एका मार्केटवर हल्ला केला. या हल्ल्यात 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 158 लोक जखमी झाले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती शनिवारी दिली. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सबरीन मार्केटमध्ये रॅपिड सपोर्ट फोर्सने हल्ला केला.
एपी न्यूज एजन्सीनुसार सुदान सरकारचे सांस्कृतिक मंत्री आणि सरकारी प्रवक्ते यांनी या घटनेची निंदा केली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या हल्ल्यात लोकांच्या आणि सरकारच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवी कायद्यांचे उल्लंघन आहे असे त्यांनी सांगितले.
सुदानमध्ये भीषण गोळीबार, 52 जणांचा जागीच मृत्यू, तर 64 हून अधिक गंभीर जखमी
सुदानच्या डॉक्टर्स सिंडीकेटने सांगितले की येथील एका हॉस्पिटलजवळच गोळा पडला. यामुळे येथे मोठे नुकसान झाले. रुग्णालयात आणण्यात आलेल्या मृतदेहांत बहुमतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. या रुग्णालयात वैद्यकिय पथके, सर्जन आणि नर्स यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला होता.
सुदान सेना आणि आरएसएफ यांच्यात एप्रिल 2023 पासून तणाव वाढला आहे. तेव्हापासून येथे संघर्ष सुरू आहे. राजधानी खार्तुम आणि पूर्वोत्तर आफ्रिकी देशातील अन्य शहरांत हा तणाव पोहोचला. आताच्या हल्ल्याने देशाला गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. मागील आठवड्यात दारफूरमधील पश्चिमी भागातील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात 70 लोकांचा मृत्यू झाला होता. या संघर्षात आतापर्यंत 28 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक बेघर होऊन निर्वासितांचे जीवन जगत आहेत. देशातील अनेक भागात उपासमारीचे भीषण संकट निर्माण झाले आहे. जिवंत राहण्यासाठी लोक चक्क गवत खाऊन दिवस काढत आहेत.
सुदानमधील अंतर्गत संघर्ष संपण्याची कोणत्याही लक्षण दिसत नाही. 28 जानेवारी रोजी अबेई (Abyei) येथे बंदूकधारी आणि गावकरी यांच्यात हिंसक चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे 52 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 64 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेवर संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
ऑपरेशन कावेरी यशस्वी, सुदानमध्ये अडकलेले 3,862 भारतीय मायदेशी