‘ऑपरेशन कावेरी’ यशस्वी, सुदानमध्ये अडकलेले 3,862 भारतीय मायदेशी
Operation Cauvery : सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या (Sudan conflict) पार्श्वभूमीवर भारताने शुक्रवारी ऑपरेशन कावेरी पूर्ण केले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) एका विमानाने 47 प्रवाशांना घरी आणण्यासाठी शेवटचे उड्डाण केले.
सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने 24 एप्रिल रोजी ऑपरेशन कावेरी सुरू केले होते. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी गट यांच्यातील प्राणघातक लढाईनंतर ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिकांसह भारतातील नागरिकांचेही हाल झाले. भारतीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारत सरकारने हा निर्णय घेतला.
Rajouri Encounter : भारतीय सैन्याचे जोरदार प्रत्युत्तर; जम्मूमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, शुक्रवारी भारतीय हवाई दलाचे C130 विमान भारतात दाखल झाल्यानंतर ऑपरेशन कावेरी पूर्ण झाले. या मोहिमेतून 3,862 लोकांना सुदानमधून बाहेर काढण्यात आले आहे. ते म्हणाले की, भारतीयांना पोर्ट सुदानमधून सौदी अरेबियातील जेद्दाह येथे नेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 17 आणि भारतीय नौदलाच्या जहाजांनी 5 फेऱ्या केल्या आहेत.
जयशंकर म्हणाले की, सुदानच्या सीमेवर असलेल्या देशांमधून 86 भारतीयांना बाहेर काढण्यात आले. “वाडी सय्यदना येथून मोठ्या जोखमीवर उड्डाण केले. ते उड्डाण देखील कौतुकास पात्र आहे,” ते पुढं म्हणाले, जेद्दाहहून लोकांना घरी आणण्यासाठी हवाई दल आणि व्यावसायिक उड्डाणे सेवेत आणली गेली.
Shivani Surve: गोव्याच्या किनाऱ्यावर शिवानी सुर्वेचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल…
जयशंकर यांनी सुदानमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची मदत केल्याबद्दल आणि बाहेर काढण्याची प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल सौदी अरेबियाचे आभार मानले. चाड, इजिप्त, फ्रान्स, दक्षिण सुदान, यूएई, यूके, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याचेही त्यांनी कौतुक केले आहे.