Pakistan News : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्सप्रेसचे अपहरण (Pakistan News) झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पाकिस्तानी सैन्याच्या एका ठिकाणावर आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आत्मघाती हल्लेखोराने पाकिस्तानी सैन्याच्या बेसमध्ये घुसून स्वतःला उडवले. हा हल्ला खैबर पख्तुनख्वा प्रांतातील टेंक जिल्ह्यातील जंडोला मिलिट्री कँपवर झाला. या हल्ल्याच्या पाठीमागे तहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचा हात असू शकतो असे सांगितले जात आहे.
पाकिस्तानी समाचार आउटलेट जियो न्यूजने सांगितले की दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यात फ्रंटियर कॉर्प्स शिबिराच्या जवळ आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यात खळबळ उडाली. त्यांनीही प्रत्युत्तरास सुरुवात केली. यात आठ ते नऊ दहशतवाद्यांना मारण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की जंडोलात जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी जंडोला चेकपोस्टवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. तरी देखील यातील एका हल्लेखोराने एफसी शिबिराजवळील एका वाहनात स्फोट घडवून आणला.
पाकिस्तानातच नाही.. भारतातही अनेक वेळा रेल्वे अपहरणाच्या घटना, कधी घडल्या जाणून घ्या
दोन दिवसांपूर्वी बलूच लिबरेशन आर्मीने 11 मार्च रोजी एका ट्रेनचे अपहरण केले होते. ही रेल्वे बलुचिस्तानातील क्वेटा शहरातून पेशावरकडे निघाली होती. या ट्रेनमध्ये 200 सुरक्षारक्षकांसह 450 पेक्षा जास्त प्रवासी होते. बीएलएच्या तावडीतून (Pakistan Train Hijack) रेल्वे सोडवल्याचा दावा पाकिस्तान सैन्याने केला आहे. परंतु या घटनेने जगभरात खळबळ उडाली. ट्रेन हायजॅक करण्याचे कारण काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पण बलुचिस्तान प्रांतातील लोकांचा राग धुमसत आहे हे मात्र नक्की.
बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने (Balochistan) समृद्ध प्रांत आहे. पाकिस्तान सरकार या भागावर सातत्याने अन्याय करत आहे असा येथील रहिवाशांचा आरोप आहे. यामध्ये चीनचे कनेक्शन देखील आहे. चीनचा महत्वाकांक्षी सीपेक प्रोजेक्ट (China Pakistan Economic Corridor) याच भागात आहे. या प्रकल्पाचा बीएलएने तीव्र विरोध केला आहे.
पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई, 43 पुरुष अन् 26 महिलांची सुटका तर 16 बीएलए सैनिक ठार