Download App

पाकिस्तानला हादरवणारी बातमी! ‘या’ शहरातील इमारतींवर बलूच बंडखोरांचा कब्जा; काय घडलं?

सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रिपोर्ट्सनुसार बंडखोरांनी शहरातील सरकारी इमारती आणि सैन्य ठिकाणे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत.

Pakistan News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात (India Pakistan Tension) जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. यातच आता पाकिस्तानला हादरवणारी बातमी (Pakistan News) आली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घडामोड घडली आहे. कालात जिल्ह्यातील मंगोचर शहरातील अनेक इमारतींवर बलूच बंडखोरांनी कब्जा केला आहे. सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रिपोर्ट्सनुसार बंडखोरांनी शहरातील सरकारी इमारती आणि सैन्य ठिकाणे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांत जोरदार गोळीबार झाल्याचेही रिपोर्टस् मध्ये म्हटले आहे. यात बंडखोरांनी एका कॅम्पवर हल्ला करून हत्यारे जप्त केली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) यांच्यात तणावाची स्थिती असतानाच ही घटना घडली आहे. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानच्या आतच त्याचे अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. दोन्ही देशांच्या तणावात बलूच बंडखोरांनी डोके वर काढले आहे. या संकटाने पाकिस्तानी सैन्याला चांगलच हैराण केलं आहे.

भारताने पाकवर आक्रमण केलं तर पुर्वोत्तर राज्यांवर कब्जा करू; पहलगाम हल्ल्यावर बांगलादेशच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

याआधी 26 एप्रिल रोजी बलूचिस्तानात एका आयईडी स्फोटात पाकिस्तान सैन्यातील दहा जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली होती. या वर्षातील मार्च महिन्यात बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. यात 380 प्रवासी होते. यानंतर पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन ग्रीन मोहिम राबवली. यामध्ये सरकारी आकडेवारीनुसार 64 लोक मारले गेले होते. बीएलएने मात्र हा दावा फेटाळत 50 सैनिक आणि 214 बंधकांना मारल्याचा नवा दावा केला होता.

भारताचा पाकला मोठा झटका  

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर (Imports) भारताने बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आलेत. या निर्बंधाला अपवाद वगळता वस्तूंच्या निर्यातीसाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव व्यापार मार्ग असलेला वाघा-अटारी क्रॉसिंग आधीच बंद करण्यात आला होता.

भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद

follow us