भारताने पाकवर आक्रमण केलं तर…, आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानावर बांगलादेश सरकारची भूमिका काय?

भारताने पाकवर आक्रमण केलं तर…, आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानावर बांगलादेश सरकारची भूमिका काय?

India attacks Pakistan we occupy northeastern states Bangladesh leader’s controversial statement after Pahalgam attack : एकीकडे संपूर्ण देशभरात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे याच हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून विविध पावलं उचलली जात आहेत. त्यातच पाकस्तानकडून वारंवार भारत आक्रमण करणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर आता बांगलादेशच्या एका नेत्याने एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांनी भारताला जणू इशाराच दिला आहे. तर यावर लगेचच बांगलादेश अंतरिम सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय आहे हे वादग्रस्त विधान?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यात आता बांगलादेशच्या सैन्याचे एक माजी अधिकारी आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय फजलूर रहमान यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेवरून भारताबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. फजलूर रहमान यांनी म्हटलं की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जर पाकिस्तानवर आक्रमण करणार असेल तर बागंलादेशने चीनशी हातमिळवणी करून भारताच उत्तर पुर्वेतील राज्य ताब्यात घ्यायला हवे. फजलूर रहमान यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद

मात्र त्यांच्या या विधानानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अंग काढून घेत जबाबदारी झटकली आहे. यावर बोलताना बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने म्हटले की, हे वादग्रस्त वक्तव्य म्हणजे सरकारची भूमिका नाही. तसेच या वक्तव्याचं सरकार समर्थन देखील करत नाही. त्यामुळे या वैयक्तिक विधानाचा बांगलादेशच्या सरकारशी संबंध जोडू नये. कारण बांगलादेश शांतता, सह-अस्तित्व, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांचा पूर्णपणे आदर करतो.

भारताचा पाकला मोठा झटका !

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर (Imports) भारताने बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

सरकारकडून फसवणूक, निवडणुकीपुरताच लाडक्या बहिणींचा वापर; लंकेंचा महायुतीवर निशाणा

राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आलेत. या निर्बंधाला अपवाद वगळता वस्तूंच्या निर्यातीसाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव व्यापार मार्ग असलेला वाघा-अटारी क्रॉसिंग आधीच बंद करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube