सरकारकडून फसवणूक, निवडणुकीपुरताच लाडक्या बहिणींचा वापर; लंकेंचा महायुतीवर निशाणा

सरकारकडून फसवणूक, निवडणुकीपुरताच लाडक्या बहिणींचा वापर; लंकेंचा महायुतीवर निशाणा

अहिल्यानगर – महायुतीची (Mahayuti) महत्त्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Bahin Yojana) एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा वापर हा केवळ निवडणुकीपुरताच केलाय, त्यांनी लाडक्या बहिणीची फसवणूक केली, अशी टीका लंकेंनी केली.

Pooja Sawant : पूजा सावंतचा मनमोहक लूक, साडीत फुललं सौंदर्य… 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा आढावा बैठक अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी भवनात पार पडली. यावेळी आमदार अशोक बापू पवार, खासदार निलेश लंके तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीनंतर खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लंके यांनी विविध विषयांवर भाष्य केल. दरम्यान, लंकेंना लाडकी बहिण योजनेबाबत विचारले असता त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही याबाबत बोलताना लंके म्हणाले की, लाडक्या बहिणींची या सरकारने शंभर टक्के फसवणूक केलेली आहे. तसेच लाडक्या बहिणींचा वापर हा केवळ निवडणुकीपुरताच केला. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या रोशाला सत्ताधाऱ्यांनी सामोरे जावे लागणार, अशा शब्दात लंके यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

रामराजे निंबाळकर यांना चौकशीसाठी नोटीस; मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणाच कनेक्शन काय? 

लाडक्या बहिणीच्या निधीवरून महायुतीत धुसपुस
राज्यातील महायुती सरकारची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजना ही आता सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. या योजनेला लागणारा निधी दुसऱ्या खात्यातून वळवला जात आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणी योजनेकडे वळविल्याने मंत्री संजय शिरसाठ हे संतापले आहेत. लाडक्या बहिणीवर होणाऱ्या खर्चावरून आता महायुतीमधील नेत्यांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे.

दरम्यान, मे उजाडलाय तरीही एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाहिये. लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्यात आहेत. त्यामुळं महायुती सरकार हा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube