Download App

UK Visa India : आता ब्रिटनमध्ये कुटुंबाला घेऊन जाता येणार नाही; कारण..,

UK Visa India : ब्रिटनमधील भारतीयांसाठी वाईट बातमी समोर येत आहे. ब्रिटनमध्ये परदेशी लोकांची संख्या कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. परदेशी कामगारांना व्हिसा(UK Visa India ) मिळण्यासाठीच्या नियमांमध्ये ब्रिटन सरकारकडून(Britan Govt) बदल करण्यात आला आहे. व्हिसा मिळण्यासाठी उच्च पगाराच्या मर्यादा वाढवण्यात आली असून कुटुंबातील सदस्यांना ब्रिटनमध्ये आणण्यासा बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी अनेक भारतीय ब्रिटनमध्ये जात असतात. त्यामुळे आता या निर्णयाचा फटका ब्रिटनस्थित भारतीयांवर होणार आहे. ब्रिटनचे गृहसचिव जेम्स क्लेव्हरली(Jems Clevharali) यांनी संसदेत यासंदर्भात निवेदन दिले आहे.

‘चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास लाजीरवाणा होतोयं..,’; स्वानंद किरकिरे ‘अ‍ॅनिमल’वर बरसले

जेम्स क्लेव्हरली निवदेनात म्हटले, ब्रिटनमधील भारतीयस्थित नागरिकांच्या आरोग्याच्या व्हिसावर कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांना ब्रिटनमध्ये आणण्यात येऊ शकणार नाही. या निर्णयाचा ब्रिटनस्थित भारतीयांवर परिणाम होणार आहे. कुशल कामगारांनी युकेमध्ये येण्यासाठी वेतनाची मर्यादाही वाढवली जाणार आहे.

Kastoori Marathi Movie : कस्तुरी चित्रपटाचे कलाकार चित्रपटाबद्दल काय सांगतात? पाहा व्हिडिओ | LetsUpp

ही सध्याची मर्यादा £26,200 वरून £38,700 पर्यंत वाढवली जाणार आहे. कौटुंबिक व्हिसा श्रेणी अंतर्गत अर्ज करणार्‍यांना समान पगाराची रक्कम लागू होणार आहे. जी सध्या 18,600 ब्रिटिश पौंड आहे. हे धोरण निष्पक्ष, सातत्यपूर्ण, कायदेशीर आणि शाश्वत असले पाहिजे,’ असे क्लेव्हरली यांनी संसदेत सांगितले आहे.

घर का भेदी लंका ढाए! ललित पाटील प्रकरणात थेट येरवडा कारागृहाच्या डॉक्टरांनाच अटक

ब्रिटिश व्हिसा मिळवण्याच्या मुद्द्यावर भारतीयांची मोठी संख्या आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, यूकेच्या गृह विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे की कुशल कामगारांसह वैद्यकीय व्यावसायिक आणि विद्यार्थी देखील व्हिसा मागणाऱ्या यादीत भारतीय अग्रस्थानी आहेत.

मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह मुख्यमंत्री राहणार की नाही? ज्योतिरादित्य सिंधिया नेमकं काय म्हणाले?

मागील वर्षी कुशल कामगार व्हिसामध्ये केवळ 9 टक्के वाढ झाली आहे. तसेच व्हिसामध्ये 135 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये भारतीय अर्जदारांची संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे.

Tags

follow us