‘एक’ चूक भोवली : भारतीय वंशाच्या नेत्याची ब्रिटनच्या गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी
Suella Bramavern : ब्रिटनच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाच्या नेत्या सुएला ब्रेव्हरमन(Suella Braverman) यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी ही कारवाई केली असून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यांसदर्भातील वृत्त वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे.
मिग-21 ची जागा घेणारे एलसीए तेजस फायटर, पाकिस्तानलाही धडकी भरेल
ब्रिटनमध्ये काढण्यात आलेल्या एका मोर्चादरम्यान, पोलिसांनी एकाच पक्षाच्या बाजूने कारवाई केल्याचं विधान सुएला ब्रेव्हरमन यांनी केल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुएला यांनी हे विधान केल्यानंतर लंडनच्या राजकारणात खळबळ उडाली होती. सुएला यांनी लंडनमध्ये समाजात तणाव निर्माण होईल असं विधान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विरोधकांकडूनही जोरदार दबाव वाढत असल्याने सुनक सरकारकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
नेमकं काय घडलं होतं?
मागील शनिवारी लंडनमध्ये पॅलेस्टिनींच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जवळपास 30 नागरिकांचा सहभाग होता. लंडनच्या रस्त्यांवरुन निघालेला हा मोर्चा संसदेपर्यंत नेण्यात आला होता. याचदरम्यान, काही इस्त्रायलचे समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं.
त्यानंतर पॅलेस्टिनी आणि इस्त्रायली समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली होती. यावेळी पोलिसांकडून 100 जणांना अटक करण्यात आली होती. या घटनेवरुन वादग्रस्त भाष्य सुएला यांनी केलं आहे. लंडन पोलिस पॅलेस्टिनी समर्थकांसारखे वागत असल्याचे वक्तव्य सुएला यांनी या मोर्चात केलं होतं. पोलिसांनी इस्रायलला पाठिंबा देणाऱ्यांनाच अटक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुएला यांच्या या वक्तव्यावर बरीच टीका झाली होती.
दरम्यान, सुएला यांच्या या आरोपांनंतर सुनक सरकारवर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढतच चालला होता. तणाव वाढवल्याचा ठपका सुएला यांच्यावर ठेवण्यात आला होता. माध्यमांमध्ये राजकारण्यांकडून मेट्रोपॉलिटन पोलिसांबद्दल खूप चुकीचे चित्रण केले गेले असल्याची प्रतिक्रिया सशस्त्र सेना मंत्री जेम्स हेप्पी यांनी दिली आहे. तर ब्रिटनचे संरक्षण सचिव ग्रँट शॅप्स आणि चान्सलर जेरेमी हंट यांनी सुएला ब्रेव्हरमनसारखे शब्द वापरले नाहीत. सुनक यांच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आहे.