मिग-21 ची जागा घेणारे एलसीए तेजस फायटर, पाकिस्तानलाही धडकी भरेल
LCA Mark 1A : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे मिग-21 (MiG-21) लढाऊ विमान पुढील वर्षी निरोप घेणार आहे. त्याच्या जागी एलसीए तेजस फायटरचा (LCA Mark-1A) समावेश केला जाईल. तेजस विमानाची प्रगत आवृत्ती, LCA मार्क 1A अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते ताफ्यात सामील होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी सांगितले होते की, मिग-21, मिग-23 आणि मिग-27 सह मिग विमानांची जागा घेण्यासाठी LCA मार्क-1 सुरुवातीपासून विकसित करण्यात येत आहे. ते म्हणाले होते की ही सर्व विमाने टप्प्याटप्प्याने निवृत्त करण्यासाठी पुरेशी हलकी लढाऊ विमाने असणे आवश्यक आहे. पश्चिम सेक्टरमध्ये LCA मार्क 1A तैनात करण्याची हवाई दलाची योजना आहे.
LCA मार्क 1A ची वैशिष्ट्ये
LCA मार्क 1A ही तेजस विमानाची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे, जी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. यामध्ये स्वसंरक्षणासाठी जॅमर पॉड, रडार वॉर्निंग रिसीव्हर आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे त्याच्या श्रेणीतील सर्वात हलके आणि सर्वात लहान बहुउद्देशीय सुपरसॉनिक फायर जेट आहे. हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केले आहे. हे हवेपासून पृष्ठभागावर आणि हवेतून हवेत हल्ल्यांसाठी सर्वोत्तम आहे.
Delhi Pollution : राजधानी दिल्लीत धुराचं साम्राज्य; वाहने, शाळांसह लाकूड जाळण्यावर बंदी…
एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, इंडो-पॅसिफिक क्षेत्र हे जगाच्या आकर्षणाचे नवे आर्थिक आणि धोरणात्मक केंद्र आहे, जे आव्हाने आणि संधी दोन्ही प्रदान करते. ते पुढे म्हणाले होते की हे लढाऊ विमान हवाईदलासमोरील ही आव्हाने कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
एलसीए मार्क 1 मिगची जागा घेईल
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत भारतीय हवाई दलाच्या विविध ताफ्यांमध्ये मिग-21 ने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण, मिग विमानांच्या अपघातानंतर त्याला फ्लाइंग कॉफिन म्हटले जाऊ लागले. भारतीय हवाई दलाला 1963 पासून मिग-21 च्या विविध मालिकेतील सुमारे 872 लढाऊ विमाने मिळाली आहेत. परंतु, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हवाई दलातून मिग-21 पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
हैदराबादमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 2 महिला
भारताने प्रथम 83 LCA मार्क 1A लढाऊ विमानांची ऑर्डर दिली होती आणि त्याची डिलिव्हरी देखील पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2024 पर्यंत होऊ शकते. एअर चीफ म्हणाले होते की आम्ही 83 LCA मार्क 1A मागवले होते, पण आणखी 97 विमाने मागवली आहेत, त्यानंतर आमच्याकडे एकूण 180 लढाऊ विमाने असतील. LCA मार्क 1A च्या आधीही, वायुसेनेने तेजस फायटर जेट 123 ची मागणी केली होती, त्यापैकी सुमारे 3 आतापर्यंत दाखल झाले आहेत. त्यानंतर तेजस LCA मार्क 1A ची डिलिव्हरी केली जाणार आहे, जी पुढच्या वर्षी म्हणजे 2024 आणि 2028 दरम्यान दिली जाईल.
Israel Hamas War : गाझामध्ये मृत्यूतांडव सुरूच; WHO कडून युद्धविरामाचं आवाहन, पण इस्त्रायल…
पूर्व लडाखमध्ये सतत पाळत ठेवली जात असल्याचे हवाईदल प्रमुखांनी सांगितले होते. शेजारी देश चीन आणि पाकिस्तान सतत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करत आहेत. अशा स्थितीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देऊ, पण कुठेतरी तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही, तर प्रशिक्षण आणि रणनीतीच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ. ते पुढे म्हणाले की हवाई दलाचे ऑपरेशनल नियोजन वेगाने सुरू आहे आणि आम्ही एलएसीवरील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहोत.