‘निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट सामील, शक्तीशाली देश असे…’; कॅनडाचे पंतप्रधानांकडून आरोपांचा पुनरूच्चार

  • Written By: Published:
‘निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट सामील, शक्तीशाली देश असे…’; कॅनडाचे पंतप्रधानांकडून आरोपांचा पुनरूच्चार

Justin Trudeau : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप मूर्खपणाचा आणि निराधार म्हणत फेटाळून लावला होता. निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडाने रॉच्या कॅनडातील केंद्र प्रमुखाची हकालपट्टी केली होती. त्यानंतर भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळं भारत आणि कॅनडातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. आता पुन्हा एकदा जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी या प्रकरणी भारताबाबत आणखी एक विधान केले आहे.

World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमका ! 

कॅनडाचे पंतप्रधान राष्ट्रव्यापी स्मार्ट एनर्जी ग्रिडच्या शुभारंभप्रसंगी माध्यमांना संबोधित करत होते. कॅनडाच्या वतीने अमेरिकेने भारतासमोर हा मुद्दा उपस्थित करावा का, या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रुटो यांनी कॅनडाच्या संसदेत जे जुने आरोप केले होते, त्याचाच पुनरूच्चार केला आहे. ते म्हणाले, कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येत भारत सरकारचे एजंट सामील आहेत. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाची हत्या करणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढणे हे देखील नियमांचे उल्लंघन आहे. आम्ही भारताशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी आमच्यासोबत काम करण्यास सांगितले.

Katrina Kaif : कतरिना कैफच्या दिवाळी स्पेशल लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष 

ट्रूडो म्हणाले की, आम्हाला भारतासोबत अतिशय गंभीर मुद्द्यांवर काम करायचे आहे आणि आम्ही ते त्यांना स्पष्ट केले आहे. सुरुवातीपासून आम्ही पुराव्याच्या आधारे खरे आरोप केले. कारण आम्ही या प्रकरणाबाबत खूप गंभीर आहोत. म्हणून आम्ही या गोष्टी भारतासह जगभरातील आमच्या अमेरिका आणि अन्य मित्र राष्ट्रांँशी शेअर केल्या. यानंतर भारताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले, त्यापाठोपाठ त्यांनी भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटलं, असंही ट्रुडो म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, एखाद्या देशानं दुसऱ्या देशाच्या मुत्सदी अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जाणार नाही, असं म्हणणं हा जगभरातील देशासाठी चितेंचा विषय आहे. जर मोठे देश कोणतेही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करू शकतात तर जग सर्वांसाठी अधिक धोकादायक होईल. त्यामुळं आंतरराष्ट्रीय संबंध अधिक गंभीर होतील. पण, आम्ही भारतासोबत प्रत्येक स्तरावर सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढेही करत राहू. याचा अर्थ आम्ही त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसोबत काम करत राहू, असं टुड्रो म्हणाले.

कोण होते हरदीप सिंग निज्जर?
निज्जर कॅनडातील सरे येथे राहत होता. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिम कॅनेडियन प्रांतातील हे सर्वात मोठं शहर आहे. 1997 मध्ये तो पंजाबमधून कॅनडाला गेला. सुरुवातीला कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम केल्यानंतर, निज्जरने लग्न केले आणि कॅनडामध्ये स्थायिक झाले. थे त्याला दोन मुले आहेत. 2020 पासून, तो सरे येथील गुरुद्वाराचे प्रमुख होता. निज्जरचे मुळं पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भरसिंग पुरा गावातले आहेत. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपूर्वी निज्जरचे पालक या गावात आले होते, अशी माहिती आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube