‘चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास लाजीरवाणा होतोयं..,’; स्वानंद किरकिरे ‘अॅनिमल’वर बरसले
Animal Movie : बहुचर्चित ‘अॅनिमल‘(Animal Movie) चित्रपट नूकताच प्रदर्शित झाला असून सध्या हा चित्रपट चाहत्यांवर भूरळ पाडत आहे. चित्रपटात अभिनेता बलबीरच्या भूमिकेत दिसत आहे. अवघ्या दोनच दिवसांत या चित्रपटाने 129.80 कोटी रुपयांची कमाई केली असून चाहत्यांकडून चित्रपटाचं चागलंच कौतूक होताना दिसत आहे. अशातच आता गीतकार स्वानंद किरकिरे(Swanand Kirkire) यांनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या महिलांविषयीच्या सीन्सवरुन बरसले आहेत.
शांतराम की – औरत , गुरुदुत्त की – साहब बीवी और ग़ुलाम , हृषीकेश मुखर्जी की – अनुपमा , श्याम बेनेगल की अंकुर और भूमिका , केतन मेहता की मिर्च मसाला , सुधीर मिश्रा की मैं ज़िंदा हूँ , गौरी शिंदे की इंगलिश विंगलिश , बहल की क्वीन सुजीत सरकार की पीकू आदि , हिंदुस्तानी सिनेमा
— Swanand Kirkire (@swanandkirkire) December 2, 2023
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांकडून चित्रपटाला काही चांगल्या तर वाईट कमेंट्स दिल्या आहेत. तर काहींनी चित्रपटाला ट्रोल केलं आहे. सध्या गीतकार स्वानंद किरकिरे यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटावर टीका केली आहे. स्वानंद किरकिरे यांची पोस्ट वाचून ते चित्रपटावर नाराजी व्यक्त करत असल्याचं दिसून येत आहे. किरकिरे पोस्टमध्ये म्हणाले, “शांतराम – औरत , गुरुदुत्त – साहब बीवी और ग़ुलाम, हृषीकेश मुखर्जींचा – अनुपमा, श्याम बेनेगल यांची अंकुर आणि भूमिका , केतन मेहता यांचा मिर्च मसाला , सुधीर मिश्रा यांचा मैं ज़िंदा हूँ , गौरी शिंदे यांचा इंगलिश विंगलिश , बहल की क्वीन सुजीत सरकार की पीकू इ. सिनेमांनी मला महिलांचा आदर करणं शिकवलं आहे. सर्व काही माहिती असतानाही जुन्या विचारसरणीत कमी आहे. मी स्वत: सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे.
निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीसोबत जाणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं
ही सर्व चित्रपटांची कृपा, पण अॅनिमल चित्रपट पाहुन मला खरंच महिलांची दया आली. महिलांसाठी पुन्हा एक नवीन पुरुष तयार झाला असून तो भीतीदायक आहे, तो पुरुष महिलांची इज्जत करीत नाही, त्यांना झुकवण्यासाठी आपला पुरुषार्थ सिद्ध करीत आहे. चित्रपटात जेव्हा रश्मिकाला मारहाण केली जात होती तेव्हा आजच्या मुलींनी चित्रपटगृहात टाळ्या वाजवल्या तेव्हाच मी तुमच्या विचारांना श्रद्धांजली वाहिली.
हताश, निराश आणि अशक्त! रणवीरचा संवादामध्ये तो बहादूर पुरुषाची व्याख्या करतो आणि म्हणतो की जे पुरुष बहादूर बनू शकत नाहीत, ते सर्व स्त्रियांचे आनंद मिळविण्यासाठी कवी बनतात आणि चंद्र-तारे तोडण्याचे वचन देऊ लागतात. मी कवी आहे! मी जगण्यासाठी कविता करतो! माझ्यासाठी जागा आहे का? , एक चित्रपट भरपूर कमाई करतोय आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास लाजीरवाणा होतोय!” या शब्दांत स्वानंद किरकिरे बरसले आहेत.