China announces 34 percent tarrif on american imports: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. भारतावर 27 टक्के, तर चीनवर 34 टक्के अतिरिक्त कर लावलाय. दोन आठवड्यांपूर्वी वीस टक्के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे आता चीनच्या वस्तूंवर अमेरिकेने 54 टक्के कर लावला आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू अमेरिकेत महाग होणार आहे. त्याचा फटका चीनच्या उत्पादनाला बसणार आहे. आता चीनने ही अमेरिकेचे (America) टॅरिफ हत्यार त्यांच्यावर उगरले आहे. चीनने अमेरिकेवर 34 टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयापूर्वी गुरुवारी या आयात शुल्क युद्धामुळे अमेरिकेचे बाजार जोरदार कोसळले आहेत. त्यात आणखी घसरण होऊन अमेरिकेचा शेअर बाजारात मंदीचा धोका आहे.
कर्मचाऱ्यांना दिलासा, आता PF चे पैसे सहज निघणार, ‘हे’ नियम बदलले
अमेरिकन सरकारने देशात आयात होणाऱ्या सर्व चिनी वस्तूंवर परस्पर शुल्क लादले आहे. अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते. ही अशी धमकी आहे जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही. तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. चीनने अमेरिकेला वाटाघाटीद्वारे त्यांचे एकतर्फी शुल्क उपाय ताबडतोब काढून टाकण्याची विनंती केले आहे.
शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’…साडेनऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान, मार्केट पडण्याचे प्रमुख 6 कारणे
दुर्मिळ धातूंवर लादला कर
अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मध्यम आणि जड धातूंच्या निर्यातीवर चीनने अतिरिक्त कर लागला आहे. या धातूंमध्ये समेरियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोशिअम, ल्युटेटियम, स्कँडियम आणि यट्रियम यांचा समावेश होतो. हा कर 4 एप्रिलपासून लागू होणार आहे. अमेरिकेने चीनवरील कर हटविल्यास चीनही अमेरिकेतील कर हटवेल, असे चीनने म्हटले आहे.
अमेरिकेचा बाजार कोसळला, मंदीची धास्ती
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अमेरिकेसह जगातील शेअर बाजाराला फटका बसत आहे. अमेरिकेचा डाऊ फीचर्स 1500 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे बाजार भांडवलामध्ये 2.5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे. तर एस अँड पी 500 आणि टेक-हेवी नॅस्डॅकशी संबंधित फ्युचर्स अनुक्रमे 50 अंकांनी आणि 125 अंकांनी खाली आला आहे. डाऊ जोन्स निर्देशांक दहा टक्के घसरला आहे. नॅसडॅक निर्देशांकमध्ये 18 टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेचा स्मॉल कॅप निर्देशांक रसेल दोन हजार अंकांनी म्हणजेच 22 टक्कांनी घसरला आहे. चीनने लादलेल्या आयात शुल्कापूर्वीच ही घसरण झाली आहे. आता आयात शुल्कामुळे आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.