Download App

China : चीनला मोठ्ठा धक्का! ‘बीआरआय’ प्रोजेक्टमधून इटलीची ‘एक्झिट’

China BRI Project :  चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला मोठा झटका (China BRI Project) बसला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जगातील गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याचा चीनचा प्रयत्न होता. पाकिस्तान हे त्याचे मोठे उदाहरण आहे. मात्र या प्रकल्पात मध्यंतरीच्या काळात अडचणी वाढल्या होत्या. आता आणखी एक धक्का युरोपातून मिळाला आहे. इटलीच्या जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni ) सरकारने चीनच्या या प्रकल्पातून (Italy) अधिकृतपणे माघार घेतली आहे. युरोपातून फक्त इटलीनेच या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दाखवली होती. आता मात्र इटली या प्रकल्पातून बाहेर पडला आहे. इटलीने चार वर्षांपूर्वी या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी चीनबरोबर (China) एक करार केला होता. आता इटालियन वृत्तपत्र कोरिएरे डेला सेरान आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की या प्रकल्पातून (Belt and Road Initiative) बाहेर पडत असल्याची माहिती इटली सरकारने तीन दिवस आधीच चीनला दिली होती.

या वर्षाच्या सुरुवातीला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतात जी 20 शिखर परिषदेत चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना सांगितले होते की इटलीने बीआरआयमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. इटालियन सरकारने आधीच सांगितले होते की चीनबरोबरील हा करार काही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. इटलीप्रमाणेच फिलीपीन्सनेही (Philippines) या प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. चीनसाठी हा दुहेरी झटका मानला जात आहे.

Pakistan : पाकिस्तान हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या

तसं पाहिलं तर इटलीचा चीनच्या प्रकल्पात सहभागी होण्याच्या निर्णयावर आधीपासूनच शंका उपस्थित केल्या जात होत्या. रक्षामंत्री गुइडो क्रोसेटो यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंतप्रधान मेलोनी यांनी सुद्धा हा निर्णय मोठी चूक होती असे अनेक वेळा म्हटले होते. हा करार मार्च 2024 मध्ये नुतनीकरण केला जाणार होता. मात्र त्याआधीच या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याची घोषणा इटलीने केली.

ज्यावेळपासून इटली या प्रकल्पात सहभागी झाल तेव्हापासून चीनला त्यांचा निर्यात 14.5 बिलियन युरोवरून 18.5 बिलियन युरो झाला होता. तर इटलीला चीनी निर्यात वाढून 33.5 बिलीयन युरोवरून 50.9 युरो झाला होता. परिणामी चीनबरोबरील व्यापार तोटा 2022 पर्यंत तीन वर्षांच्या काळात दुप्पट झाला होता. इटलीप्रमाणेच अन्य काही देश या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

Italy PM Giorgia Meloni Breakup : ‘या’ कारणामुळे जी 20 परिषदेत चर्चेत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा घटस्फोट

Tags

follow us