China Issued Visas for Indians : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि (Donald Trump) चीन यांच्यात ट्रेड वॉर सुरुच (Trade War) आहे. याच दरम्यान चीनने भारताला आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनने भारतीयांसाठी (China News) एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीयांसाठी 85 हजारांपेक्षा जास्त व्हिसा चीन दूतावासाने जारी केले आहेत. भारतातील चीनच्या दुतावासाने जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान 85 हजारांपेक्षा जास्त व्हिसा जारी केले आहेत.
भारत आणि चीन यांच्यातील संबंध (India China Relation) ताणले गेले आहेत. चीनने सीमावाद उकरुन काढल्याने दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. आता हा तणाव कमी झाला असला तरी संपलेला नाही. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केल्याने चीनची कोंडी झाली आहे.
चीनी राजदूत शू फेहाँग यांनी जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी चीनमध्ये यावे असे सांगितले आहे. चीनमधील खुले आणि सुरक्षित वातावरणाचा लाभ घ्या असे आवाहन फेहाँग यांनी केले. यानंतर त्यांनी सोशल मिडियावर पोस्टही केली आहे. मागील आठवड्यापर्यंत चीनी दूतावास आणि कॉन्सुलेट्सने चीनची यात्रा करण्यासाठी भारतीय नागरिकांना 85 हजारांपेक्षा जास्त व्हिसा जारी केले आहेत.
टॅरिफ पे टॅरीफ सुरूच! चीनकडून अमेरिकेला 125 टक्के कर लादूनच उत्तर
अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापार युद्धात चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनने भारतीय नागरिकांसाठी मोठ्या संख्येने व्हिसा जारी केले आहेत. याव्यतिरिक्त पर्यटनाच्या उद्देशाने चीनमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांना काही खास सवलतीही चीनने दिल्या आहेत. चीनच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना आता ऑनलाइन अपॉइंटमेंटची गरज राहणार नाही. चीनच्या या निर्णयामुळे व्हिसा प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. भारतीय नागरिक जर कमी कालावधीसाठी चीनला जात असतील तर त्यांना त्यांचा बायोमेट्रिक डेटा सादर करण्याचीही गरज राहणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. त्यात एक दिलासा म्हणून अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफमध्ये 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनवर अमेरिकेकडून 145 टक्के कर लादण्यात आला आहे. त्याला उत्तर देत चीनने देखील अमेरिकेवर 125 टक्के कर लादला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ ब्रेक मागे वेगळाच प्लॅन; चीनवर दबाव अन् जगभरात बिजनेस डील..