Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याने अवघ्या जगाला (Moscow Attack) हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 133 पर्यंत पोहोचली आहे. अजूनही जखमींतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लेखोरांना कोठरात कठोर शिक्षा देऊ असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी काल सांगितले होते. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या हल्ल्याप्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रशियाच्या सर्वोच्च तपास संस्थेने ही माहिती दिली. या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस संघटनेने स्वीकारली असली तरी हा हल्ला युक्रेनशी संबंधित असल्याचे सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. दरम्यान, या घटनेनंतर आज संपूर्ण रशियात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
मॉस्को दहशतवादी हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची भीती, 11 जणांना अटक
या हल्ल्यानंतर प्राथमिक तपासणी करणाऱ्या समितीने काही धक्कादायक माहितीचा खुलासा केला आहे. दहशतवाद्यांनी कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार केला. यासाठी ऑटोमॅटिक हत्यारांचा वापर केला. बॅलेस्टिक, जेनेटिक आणि फिंगरप्रिंट तपासणीचे काम सुरू आहे. या परिसरात आग लावण्यासाठी दहशतवाद्यांनी ज्वलनशील पदार्थांचा वापर केला होता. रशियाच्या गुप्तचर संस्थांनी या हल्ल्यानंतर 11 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये चार अतिरेक्यांचा समावेश आहे.
रशियन प्रसामाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अनोळखी लोकांनी क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रवेश केला आणि येथील कार्यक्रम सुरू होण्याआधीच गोळीबार केला. या हल्ल्यात ग्रेनेडही फेकण्यात आले. अचानक हल्ला झाल्याने येथे धावपळ उडाली. जीव वाचविण्यासाठी लोक पळत सुटले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत. तर बंदूकधारी अज्ञात हल्लेखोर बेछूट गोळीबार करताना दिसत आहेत. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबानिन यांनी या हल्ल्याचे वर्णन राष्ट्रीय आपत्ती असे केले आहे. सध्या घटनास्थळी 50 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत.
गयाहून रशियाला जाणारे Falcon 10 विमान कोसळले, 4 क्रू मेंबरसह 6 जण बेपत्ता