मॉस्को दहशतवादी हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची भीती, 11 जणांना अटक
Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील (Moscow Concert Hall Attack) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी (दि.22) रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 150 वर जाऊन पोहोचला असून, हा आकडा आणखी वाढण्याची भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली. पाच हत्यारबंद हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 150 नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक जखमी झाले असून, यातील 121जखमी नागरिकांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने रशियन मीडियाने दिली असून, आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या 41 नागरिकांची ओळख पटवण्यात आली आहे. (Moscow Terror Attack 150 Dead Toll Expected To Rise Says Authorities)
Russia : रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोण? तीन दिवस चालणार मतदान; पुतिन यांचं पारडं जड
या हल्ल्यादरम्यान अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 145 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. फक्त गोळीबारच नाही तर बॉम्ब देखील फेकण्यात आले. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयएसआयए या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. परंतु, संघटनेकडून या हल्ल्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा अद्याप देण्यात आलेला नाही. तर, दुसरीकडे या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, यात 4 बंदूकधाऱ्यांचा समावेश आहे.
#WATCH| Concert attack near Moscow | Earlier visuals from the spot where five gunmen dressed in camouflage opened fire with automatic weapons at people at a concert in the Crocus City Hall near Moscow, killing at least 60 people and injuring 145 more in an attack claimed by… pic.twitter.com/lmrEdwQlbG
— ANI (@ANI) March 23, 2024
असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेला अमेरिकी गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आयएसआयएसकडून या हल्ल्याचा कट अफगाणिस्तानमध्ये केला जात असल्याची माहिती यूएस तपास यंत्रणांना कळाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता रशियन गार्ड्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या कारवाईत हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे. जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी येथे 50 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत.
रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय?
हल्लेखोरांपैकी 11 जणांना पकडण्यात यश आलेआहे. रशियन प्रसामाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अनोळखी लोकांनी क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रवेश केला आणि येथील कार्यक्रम सुरू होण्याआधीच गोळीबार केला. या हल्ल्यात ग्रेनेडही फेकण्यात आले. अचानक हल्ला झाल्याने येथे धावपळ उडाली. जीव वाचविण्यासाठी लोक पळत सुटले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत. तर बंदूकधारी अज्ञात हल्लेखोर बेछूट गोळीबार करताना दिसत आहेत. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबानिन यांनी या हल्ल्याचे वर्णन राष्ट्रीय आपत्ती असे केले आहे. सध्या घटनास्थळी 50 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत.