रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय?

रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय?

NATO Decision Amid Russia Ukraine War : दोन वर्षे होत आली तरीही रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाचा कट्टर शत्रू म्हणून ओळखली जाणारी नाटो (NATO) संघटना. या संघटनेतील सदस्य देशांनी मोठा सैन्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमणाला आळा घालण्याच्या उद्देशाने शक्ति प्रदर्शनाचा हेतू यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. या सैन्य अभ्यासात 90 हजार सैनिकांचा सहभाग असणार आहे. काही महिने हा युद्धाभ्यास सुरू राहणार आहे.

नाटोच्या अधिकाऱ्याने सांगितले की हा सैन्य अभ्यास रशियाला इशारा आहे की नाटो संघटनेतील कोणत्याही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास नाटो सक्षम आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच हा युद्धाभ्यास सुरू होणार आहे. रशिया युक्रेन युद्धात नाटो देशांनी उघडपणे सहभाग घेतलेला नाही. परंतु,  युक्रेनला हत्यारे आणि आर्थिक मदत मात्र दिली आहे. या युद्धामुळे फिनलँड, पोलँड आणि हंगेरी यांसारख्या देशात अलर्ट जारी करण्यात आला असून या देशातही नाटो सैनिक आहेत. कोल्ड वॉरनंतर पहिल्यांदाच नाटो देशात इतकी सतर्कता पाळली जात आहे.

Russia Ukraine War : रशियाकडून पुन्हा मिसाईल आणि ड्रोनने हल्ला, 11 जणांचा मृत्यू

या युद्धाभ्यासात स्वीडनही सहभागी होणार आहे. स्वीडन या संघटनेचा सदस्य नाही तरीदेखील यात सहभागी होण्याचा निर्णय स्वीडन सरकारने घेतला आहे. नाटोत सहभागी होण्यासाठी स्वीडननेही अर्ज केला आहे मात्र या अर्जावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. ब्रिटन सरकारचे संरक्षण मंत्री ग्रँट शेप्स यांनी सांगितले की आम्ही या सैन्य अभ्यासात 20 हजार सैनिक पाठवणार आहोत. याव्यतिरिक्त फायटर जेट, सर्विलांस प्लेन, वॉरशिप आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात पूर्व युरोपातील देशांत तैनाती केली जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज