Russia Ukraine War : रशियाकडून पुन्हा मिसाईल आणि ड्रोनने हल्ला, 11 जणांचा मृत्यू

Russia Ukraine War : रशियाकडून पुन्हा मिसाईल आणि ड्रोनने हल्ला, 11 जणांचा मृत्यू

Russia Ukraine War : गेल्या काही महिने रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) युद्ध सुरु आहे. आता पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर गुरुवारी (दि.२६) हल्ला केला. या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. (Russia Ukraine) जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला रणगाडे पाठवण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने गुरुवारी संपूर्ण युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला (Drone attack) करण्यात आला. या हल्यानंतर अमेरिकेने रशियावर टीका केली. याबरोबरच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी नियमित निवेदनाता युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि सर्व जखमींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात आली.

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला रणगाडे पाठवण्याची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्या दिवशीच रशियाने युक्रेनवर ड्रोनचा हल्ला केला. हा हल्ला इतका मोठा होता की युक्रेनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला आहे, युक्रेनच्या ११ प्रादेशिक भागातील ३५ इमारतींचे यावेळी नुकसान झाले आहे. तर दोन ठिकाणी आग लागली आहे. युक्रेनचे आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते ऑलेक्जेडर खोरुन्झी यांनी केलेल्या दाव्यानुसार कीव्ह शहराच्या क्षेत्रात अधिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बचावकार्यात युक्रेनचे १०० सैनिक आहेत. ते पुढे असेही असे म्हणाले की, लोक आपापल्या कामावर जात होते, दरम्यान युक्रेनमध्ये हवाई हल्ल्यास सुरवात झाली. त्यानंतर राजधानीतील भूमिगत मेट्रो स्थानकांवर काही काळ गर्दी जमली होती. झेलेन्स्की यांचा क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनने म्हटले आहे की, त्यांनी रात्रभर रशियाने पाठवलेले सर्व २४ ड्रोन पाडले गेले आहेत. ज्यामध्ये १५ राजधानी कीव्हच्या आसपास पाडण्यात आले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिरेकी राज्याने आम्हाला मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याने धमकावण्याचा आणखी एक प्रयत्न फसला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube