Download App

ट्रम्प यांचा नवा टॅरिफ बॉम्ब! भारतासह सर्व देशांना जशास तसा टॅक्स; ट्रेड वॉर भडकणार..

एखादा देश आमच्याकडून टॅक्स आणि टॅरिफ घेत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यावर तितकाच टॅक्स आणि टॅरिफ आकारू असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. संरक्षणापासून प्रत्येक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविणे यांसह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी भारताला झटका देणारा एक निर्णयही जाहीर केला. जो देश आमच्याकडून जितकं शुल्क आकारेल तितकेच शुल्क आम्ही त्या देशावर लादू. आम्ही त्यांच्याकडून जास्त शुल्क घेणार नाही किंवा त्यांच्यावर कमी शुल्कही आकारणार नाही. एखादा देश आमच्याकडून टॅक्स आणि टॅरिफ घेत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यावर तितकाच टॅक्स आणि टॅरिफ आकारू असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

PM मोदीच करणार बांग्लादेशचा फैसला, अमेरिकेकडून फ्री हँड; ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेचा हा निर्णय अमेरिकेचे मित्र देश आणि विरोधक या दोन्हींच्या विरोधात व्यापारी रणनीतीचा हिस्सा आहे. यामुळे आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळेल. आम्ही एक समान मैदानावर खेळू इच्छित आहोत असे ट्रम्प एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ नितीचा उद्देश विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या उच्च शुल्कांचा सामना करण्याचा आहे अशी माहिती व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने दिली.

रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय

एखाद्या देशाकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर जो कर आकारला जातो त्यास टॅरिफ म्हटले जाते. म्हणजेच जो देश अमेरिकेच्या वस्तूंवर जितका टॅरिफ आकारील तितकाच टॅरिफ अमेरिका त्या देशांच्या वस्तूंवर लावील. निवडणूक प्रचाराच्या काळात रेसिप्रोकल टॅरिफबाबत जशास तसे एक टॅरिफच्या मोबदल्यात दुसरा टॅरिफ असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. सत्तेत येताच त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे एखादा देश दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क आकारतो त्याच पद्धतीने दुसरा देश त्याच पद्धतीने आयात शुल्क आकारणाऱ्या देशाच्या वस्तूंवर टॅरिफ आकारतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याला जशास तसे धोरण म्हटले जाऊ शकते. उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखाद्या देशाने अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के आयात शुल्क लावले तर अमेरिका सुद्धा त्या देशाच्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ आकारील.

पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश; पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात बैठक, मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील.. 

भारतावर काय परिणाम होणार

पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, भारत या गटात सर्वात वर आहे. काही लहान देश आहेत जे जास्तीचा टॅरिफ आकारतात पण भारतही जबरदस्त टॅरिफ वसूल करतो. भारतात टॅक्स आणि टॅरिफ इतके जास्त होते की हार्ले डेविडसन कंपनी आपली वाहनेच विक्री करू शकत नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने या वाहनांचे उत्पादन भारतातच सुरू केले. आता लोक येथेही असेच करू शकतात. कंपन्या अमेरिकेत युनिट सुरू करू शकतात.

या नव्या धोरणाचा परिणाम भारतावर नक्कीच होणार आहे. भारतातील घेरलू उद्योगांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे. ऑटोमोबाइल, कापड आणि अन्य उद्योगांवर याचा परिणाम होऊ शकतो. भारताने जर टॅरिफ दरात कपात केली तर याचा परिणाम महसुलावर होणार आहे. उत्पन्न कमी होणार आहे.  यामुळे देशांतर्गत उद्योगांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us