नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पुन्हा एकदा युट्यूब (YouTube) आणि फेसबुकवर (Facebook) एंट्री झाली आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतताच त्यांनी लिहिले I’M BACK! म्हणजेच मी परत आलो आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या सोशल अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती. अखेर दोन वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प हे सोशलवर सक्रिय दिसणार आहे.
का घालण्यात आली होती बंदी? जाणून घ्या
अमेरिकन संसदेवर 6 जानेवारी 2021 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर फेसबुक आणि यूट्यूब या दोन्ही कंपन्यांनी ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली. दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट आणि यूट्यूब व्हिडिओमध्ये दावा केला आहे की 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाली होती. यानंतर हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी अकाऊंटवर बंदी घालण्यात आली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन वर्षांनंतर फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. “मी परत आलो. ट्रम्प यांनी 12-सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे, ज्यामध्ये ते 2016 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांचे विजयी भाषण देताना दिसत होते, जसे की त्यांनी म्हटले: तुम्हाला इतका वेळ वाट पाहण्यास लावल्याबद्दल क्षमा करा.
बावनकुळेंनी बॉम्ब फोडला : भाजप 240 तर शिवसेनेला फक्त 48 जागा देणार…
सोशलवर ट्रम्प यांचा बोलबाला
76 वर्षीय रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा सोशलवर चांगलीच पकड आहे. त्यांची मोठी फॅनफॉलोईंग आहे. ट्रम्प यांचे फेसबुकवर 34 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर त्यांचे 2.6 दशलक्ष सदस्य आहेत. तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ट्रम्प पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.
अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटींची खंडणीही मागितली होती…
ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंटही झाले होते बॅन
कॅपिटल हिल दंगलीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आले होते. ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा एकदा सुरु केले. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटचे 87 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.