Donald Trump Tariff Letter : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या (Donald Trump) वेगळ्याच मूडमध्ये आहेत. त्यांनी बुधवारी आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आणखी काही देशांना पत्रे पाठवली आहेत. नव्या व्यापार करारांतर्गत त्यांनी या पत्रात 22 देशांना टॅरिफबाबत (Tariff War) माहिती दिली आहे. फिलीपीन्स, श्रीलंका, ब्रुनेई, अल्जीरिया, लीबिया, इराक, मोल्दोवा आणि ब्राझील यांसह एकूण 22 देशांना पत्र पाठवण्यात आली आहेत. यात 20 ते 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ आकारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. नवीन टॅरिफ येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
नवीन टॅरिफ अमेरिकेसाठी गरजेचे आहेत जेणेकरून आधीच्या चुकीच्या धोरणांत सुधारणा करता येईल. यामध्ये अमेरिकेवर व्यापरी तोटा थोपण्यात आला होता. या धोरणांत टॅरिफ आणि गैर टॅरिफ समस्यांचा समावेश होता. अमेरिकेवर लादलेला हा व्यापार तोटा अर्थव्यवस्थाच नाही तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक होता असे डोनाल्ड ट्रम्प यांचे मत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच! ‘या’ 14 देशांवर नवीन टॅरिफचा भार; दिवसही ठरला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत एप्रिल महिन्यातच इशारा दिला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. या देशांवर 25 ते 50 टक्क्यांदरम्यान टॅरिफ आकारण्यात येणार आहे. याआधी ट्रम्प सरकारने 14 देशांना अशीच पत्रे धाडली होती. आता पुन्हा आणखी काही देशांना पत्रे पाठवली आहेत. या देशांतून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर शुल्क आकारण्यात येणार आहे. यावेळी शुल्काचे दर जास्त दिसत आहेत. त्यामुळे या देशांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून या देशांनी जर अमेरिकेवर असाच टॅक्स आकारला तर अमेरिका आणखी तितकाच वाढीव टॅक्स आकारणार आहे. त्यामुळे या देशांची आणखी कोंडी होणार आहे. आता जी पत्रे पाठवली आहेत. त्यात काही देशांवर कमी टॅरिफ आकारण्यात आला आहे. इतकाच काय तो दिलासा देण्यात आला आहे. आतापर्यंत 22 देशांना पत्रे मिळाली आहेत. यामध्ये अमेरिकेचे प्रमुख सहकारी जपान, दक्षिण कोरियासह इंडोनेशिया, बांग्लादेश, थायलंड यांचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले होते की तांबे आणि औषधांवर टॅरिफ लावला जात आहे. तांब्यासाठी नियोजित दर 50 टक्के आहे. औषध उत्पादनांवर तर 200 टक्के शुल्क आकारले जाऊ शकते. परंतु, निर्मात्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ देण्यात येईल. ब्रिक्स समुहातील सदस्य देशांवरही 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारण्यात येईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
श्रीलंका 30 टक्के
लीबिया 30 टक्के
इराक 30 टक्के
अल्जीरिया 30 टक्के
फिलीपीन्स 20 टक्के
ब्रुनेई 25 टक्के
मोल्दोवा 25 टक्के
म्यानमार 40 टक्के
लाओस 40 टक्के
कंबोडिया 36 टक्के
थायलंड 36 टक्के
बांग्लादेश 35 टक्के
सर्बिया 35 टक्के
इंडोनेशिया 32 टक्के
बोस्निया आणि हर्जेगोविना 30 टक्के
दक्षिण आफ्रिका 30 टक्के
जपान 25 टक्के
कजाकस्तान 25 टक्के
मलेशिया 25 टक्के
दक्षिण कोरिया 25 टक्के
ट्यूनिशिया 25 टक्के
ब्राझील 50 टक्के