Donald Trump swearing-in ceremony : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु झालं आहे
मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांना निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, ट्रम्प यांनी हार मारली नाही. त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने सत्ता काबीज केली. आणि सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय वेळेनुसार, आज रात्री १०.३० वाजता ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी समारंभ युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.
Donald Trump sworn-in as 47th US President, JD Vance sworn in as US Vice President.#PresidentTrump #Trump #Trump2025 #JDVance pic.twitter.com/pNlIHBxjDL
— NEWSDAILY MEDIA GROUP (@NEWSDAILY123) January 20, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जे.डी. वन्स यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. ट्रम्प यांनी बायबलवर हात ठेवून दुसऱ्यांदा पदाची शपथ घेतली. १९५५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईने त्यांना बायबल भेट दिले होते. त्यावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली. मी शपथ घेतो की मी युनायडेट स्टेटसच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठेने पार पाडेन आणि माझ्या क्षमतेनुसार संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करेन, अशी शपथ ट्रम्प यांनी घेतली.
पालकमंत्रिपदावरून आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय…; जयंत पाटलांचा महायुती सरकारला टोला
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला ७०० पाहुणे उपस्थित होते. भारताकडून, उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील उपस्थित होते. याशिवाय एलोन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यू हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
मेलानिया ट्रम्प यांचीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती…
पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मेलानिया ट्रम्प यांनी न्यूयॉर्कहून डिझाइन करण्यात आलेला खास ट्रेस परिधान केला होता. मेलानिया यांचा हा खास ड्रेस राल्फ लॉरेनने डिझाइन केला होता. तसंच या खास ड्रेसवर मेलानिया यांनी बोलेरो जॅकेट घातलं होतं.