नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तोशाखाना प्रकरणी अडचणीत आले आहेत. रविवारी इस्लामाबाद पोलीस खान यांना अटक करण्यासाठी लाहोरमधील त्याच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले. इम्रान खान हे लाहोरमधील जमान पार्क नावाच्या घरात राहत आहेत. तोषखाना प्रकरणात ते वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. इम्रान खानला अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांचे एक पथक त्याच्या लाहोर येथील घरी पोहोचले आहे. मात्र, पोलिसांना इम्रान खान येथे सापडलेले नाही.
इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते त्यांच्या घराबाहेर जमले आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री फवाद चौधरी यांनी सरकारला लाल रेषा ओलांडू नका, असा इशारा दिला आहे. माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि असद उमर हे देखील इम्रान यांच्या घरी त्याच्या अटकेच्या निषेधार्थ हजर आहेत.
एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? ; अंबादास दानवे संतापले..
तोशाखाना नावाच्या सरकारी डिपॉझिटरीतून मिळालेल्या भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप इम्रान खानवर होता. गेल्या आठवड्यात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते हजर राहणार होते, मात्र ते होऊ शकले नाहीत.
महिलांना नोकरीची संधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिकापदाच्या 652 जागांसाठी भरती
दिवसभरात तीन न्यायालयांना भेट दिल्यानंतर सुनावणीसाठी हजर राहण्यास उशीर झाल्याने वॉरंट रद्द करण्यासाठी ते न्यायालयात जातील असे त्याच्या वकिलांनी सांगितले होते. अटक वॉरंटमध्ये इम्रान खानला ताब्यात घेतल्यानंतर 7 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्लामाबादच्या महानिरीक्षकांनी इम्रान खानला आज अटक करण्याचे आदेश जारी केले आहेत.