महिलांना नोकरीची संधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिकापदाच्या 652 जागांसाठी भरती

महिलांना नोकरीची संधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिकापदाच्या 652 जागांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी (women) आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ( Brihanmumbai Municipal Corporation ) परिचारिका (Staff Nurse) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 21 मार्च 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका 

रिक्त पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जीएनम म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी अभ्यासक्रम

एकूण रिक्त पदे : 652

वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे पर्यंत.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Latur News : लातुरात खळबळ.. काँग्रेस नेत्याच्या घरात भावाने संपविले जीवन; पोलीस घटनास्थळी

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

● अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube