Google Jobs : ऑफीसमध्ये जा, तुमची बॅग बाजूला ठेऊन द्या आणि निवांत आराम करत राहा. ऑफीसमध्ये या गोष्टी कशा चालू शकतील. ऑफीसचं हे कल्चरच नाही. पण, एक कंपनी अशी आहे जी यासाठीच दर महिन्याला लाखो रुपये पगार देत आहे. खरंतर ही नोकरी देणारी कंपनी आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे. गुगल हीच (Google Jobs) कंपनी आहे. या कंपनीनेच अशा अनोख्या जॉबची ऑफर दिली आहे.
गुगल आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या (AI) क्षेत्रात सर्वात टॉपवर पोहोचायचे असते. यासाठी त्यांनी असं काही केलं आहे ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. गुगलने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना पछाडण्यासाठी एक खास प्लॅन तयार केला आहे. कंपनी जगातील टॉप एआय एक्सपर्ट्सना काहीच न करण्यासाठी लाखो रुपये देत आहे. या स्कीमचा फायदा काही निवडक कर्मचाऱ्यांना होत आहे. या लोकांना काहीच करायचं नाही. फक्त एकच करायचं आहे ते म्हणजे गुगलच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांत जॉबसाठी जायचं नाही.
बिजनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार गुगल एआय स्पेशालिस्टना नोकरीवर ठेवत आहे. या लोकांना एका काँट्रॅक्टवर सही करावी लागते. यात स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की या लोकांनी कमीत कमी एक वर्षापर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्धी कंपनीत काम करणार नाही. आपल्या कंपनीत जे काही इनोवेशन सुरू आहे त्याची माहिती दुसऱ्या कोणत्याच कंपनीला मिळू नये असे गुगलला वाटते. यासाठीच कंपनीने लाखो रुपयांचा हा खटाटोप सुरू केला आहे.
रोबोट्स स्वत: च निर्णय घेणार अन् जगात उलथापालथ होणार! 2030 साल कल्पनेच्या बाहेर असणार
ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गार्डनर लीव देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की या कर्मचाऱ्यांना काहीच काम न करता पगार मिळणार आहे. हे कर्मचारी गुगल किंवा अन्य कोणत्याच कंपनीसाठी काम करणार नाहीत. कर्मचाऱ्यांना अगदी शांततेत ऑफीसला यावं. आराम करावा आणि घरी जावं.
गुगल काहीच काम न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पगार तरी का देतोय असा प्रश्न विचारला जात आहे. याचं उत्तर एआयच्या वेगात लपलं आहे. OpenAI, ChatGPT आणि गुगलच्या Gemini सारख्या मॉडेल्सच्या (Google Gemini) यशानंतर कंपनीला फक्त पैसेच नाही तर आपला प्रभाव तयार करण्याचीही संधी मिळते.
इनोवेशनमध्ये सहा महिन्यांचा उशीर एखाद्या प्रॉडक्टला मार्केटबाहेर काढू शकतो. त्यामुळे टॅलेंटेड लोकांना आपल्याकडे ठेऊन गुगल दुसऱ्या कंपन्यांचे इनोवेशन रोखू शकते. याच कारणामुळे कंपनी आपल्याकडील टॉप कर्मचाऱ्यांना काहीच न करण्याचा पगार देत आहे. जेणेकरून या कर्मचाऱ्यांनी जास्त पगाराच्या अमिषाने दुसरी कंपनी जॉइन करू नये.
बापरे! Mobile App चोरताहेत तुमचा डेटा; Uninstall केल्यानंतरही सोडत नाहीत पिच्छा..