M90 Rocket : गेल्या ऑक्टोबरपासून सुरु असणाऱ्या इस्रायल- हमास युद्धात (Israel-Hamas War) आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. यातच आता पुन्हा एकदा हमासने इस्रायलवर (Israel) मोठा हवाई हल्ला केला आहे. माहितीनुसार, आज इस्रायलवर हमासने (Hamas) दोन M90 रॉकेट (M90 Rocket) डागले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हमासच्या सशस्त्र अल-कसाम ब्रिगेड्सने मंगळवारी इस्त्रायच्या तेल अवीव शहरावर हवाई हल्ला केला आहे. तेल अवीव आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हमासने दोन M90 रॉकेटसह जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. डिसेंबरमध्ये इस्रायलवर M-90 रॉकेटने हल्ला करण्यात येणार असल्याचा इशारा अल कसम ब्रिगेडने दिला होता.
M-90 रॉकेटची शक्ती किती?
M90 रॉकेट एक प्रकारचा मल्टिपल रॉकेट लाँचर आहे. याच्या मदतीने एकाच वेळी तब्बल आठ रॉकेट लाँच करता येतात. M90 रॉकेटची फायरिंग रेंज 90 किलोमीटरपर्यंत असते. तसेच हे हलक्या प्रकारचे रॉकेट लाँचर आहे. याचा वापर रणगाडाविरोधी रॉकेट म्हणूनही करण्यात येतो. माहितीनुसार, गाझा पट्टीच्या मध्यवर्ती भागातून किंवा दक्षिण भागातील खान युनूस येथून तेल अवीवर हमासने हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे इस्रायलने देखील हमासला प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामध्ये 19 पॅलेस्टिनी ठार झाले असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझा येथून दोन रॉकेट डागण्यात आले, त्यापैकी एक समुद्रात पडले आणि दुसरे इस्रायलच्या हद्दीत पोहोचले नाही. तर हमासच्या लष्करी शाखेने एका निवेदनात म्हटले आहे की, पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूचा बदला म्हणून आम्ही इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे.
यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियन संसदेत यश चोप्रांचे टपाल तिकीट लाँच
आम्ही दोन ‘M90’ रॉकेटमधून क्षेपणास्त्रे डागली आणि तेल अवीव शहरावर बॉम्बफेक केली. यापूर्वी मे 2024 मध्ये तेल अवीववर रॉकेट डागले असल्याचा दावा हमासकडून करण्यात आला होता.