Red Sea Houthi Attack : इस्त्रायल आणि हमास युद्ध सुरू असतानाच (Israel Hamas War) अमेरिका आणि ब्रिटेनने हूथी बंडखोरांचा (Houthi Rebels) बिमोड करण्याच्या (Red Sea Houthi Attack) दिशेने पावले टाकली आहेत. लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या या बंडखोरांच्या ठिकाणांवर दुसरा मोठा हल्ला करण्यात आला. दोन्ही देशांनी येमेनमधील हूथींच्या तळांवर संयुक्त हल्ले केले. एकूण आठ तळांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती अमेरिकेने (America) दिली. यामध्ये अंडरग्राउंड स्टोरेज साइट आणि हूथींची मिसाइलवर लक्ष ठेवणारी यंत्रणा निकामी करण्यात आली. या हल्लेखोरांना तत्काळ संपवणे आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जहाजे आणि चालक दलांना मुक्त करण्याचे आवाहन या देशांनी केले.
नव्या युद्धाची ठिणगी! अमेरिकेचा ‘हूथी’ बंडखोरांवर येमेनमध्ये मोठा हवाई हल्ला
अमेरिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सामरिक तणाव कमी करण्यासाठी आणि लाल समुद्रातील परिस्थिती पहिल्यासारखी करणे महत्वाचे आहे. यासाठी हूथींना इशारा देत आहोत की त्यांनी हल्ले थांबवावेत. समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापाराचे रक्षण करण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. अमेरिकेचा हूथी बंडखोरांवर हा आठवा हल्ला आहे. तर अमेरिका आणि ब्रिटेन या दोन्ही देशांचा हा दुसरा संयुक्त हल्ला आहे. याआधी दोन्ही देशांनी 11 जानेवारी रोजी हूथींवर मोठा हवाई हल्ला केला होता.
या हल्लेखोरांना तत्काळ संपवणे आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जहाजे आणि चालक दलांना मुक्त करण्याचे आवाहन या देशांनी केले. या उपरही जर हुती बंडखोरांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या तर परिणाम भोगण्याचीही तयारी त्यांनी ठेवावी. हूथी बंडखोरांचे म्हणणे आहे की त्यांच्या हल्ल्यांचा उद्देश गाझातील इस्त्रायलचे हल्ले समाप्त करण्याचे आहे.
कोण आहेत हूथी बंडखोर?
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने जंगजंग पछाडले आहे. पण त्याचवेळी या युद्धामुळे हूथी बंडखोरही आक्रमक झाले आहेत. हूथी हा येमेनमधील शिया मुस्लीम समुदायाचा एक सशस्त्र अतिरेकी गट आहे. 1990 मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हुसैन अल हूथी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्या नावावरुव या संघटनेला हूथी हे नाव मिळाले.
Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला