IMF Loan To Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असताना पाकिस्तानसाठी (India Pakistan War) फायद्याची बातमी आली आहे. भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला (IMF Loan) तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे. आयएमएफने याआधीही पाकिस्तानला कर्ज दिले होते. या कर्जाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. संघटनेच्या या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप घेतला. पाकिस्तान आयएमएफकडून सातत्याने कर्ज घेत आहे. परंतु, या कर्जाचा उपयोग देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याऐवजी आतंकवादला पोसण्यात करत आहे.
वारंवार कर्ज दिल्यानंतरही पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत सुधारणा का होत नाही असा सवाल भारताच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. यानंतर या मुद्द्यावर मतदान घेतले. भारताने या मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. आयएमएफचा (International Monetary Fund) हा निर्णय जागतिक मूल्ये आणि सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक आहे असे संकेत दिले.
जम्मूसह काही शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, उरीत गोळीबार, पठाणकोटात ड्रोनची घुसखोरी
पाकिस्तान मागील 35 वर्षांतील 28 वर्षे आयएमएफतडून आर्थिक मदत घेत आला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात तर पाकिस्तानने चार वेगवेगळ्या आयएमएफ कार्यक्रमांचा लाभ घेतला आहे. आधी दिलेल्या कर्जाच्या पैशांतून जर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असती तर त्याला सारखी मदतीची गरज का पडली असती असाही सवाल भारताने या बैठकीत उपस्थित केला.
पाकिस्तानी सैन्य (Pakistan Army) फक्त देशाच्या राजकारणाशीच नाही तर अर्थव्यवस्थेशीही जोडलेले आहे. सेनेच्या अधीन राहून काम करणारे अनेक व्यापारी संस्था आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकतात. अशा परिस्थितीत आयएमएफने दिलेल्या कर्जाचा योग्य वापर होणे कठीण आहे असेही भारताने स्पष्ट केले. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार आयएमएफने दिलेल्या कर्जाचा वापर दहशतवाद फैलावण्यासाठी करू शकतात. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या निधीचा वापर करुन पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतो असा आरोपही भारताने या बैठकीत केला.
यानंतर आयएमएफने भारताच्या आक्षेपांची नोंद घेतली. मात्र तांत्रिक आणि प्रक्रिया संबंधी मर्यादांचा हवाला देत पाकिस्तानला कर्ज देण्याच्या निर्णयाला योग्य ठरवले. आयएमएफच्या या निर्णयावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. भारताच्या आक्षेपांचा आणि नाराजीचा (India Pakistan War) आयएमएफवर कोणताही परिणाम झाला नाही.
मोठी बातमी! देशातील 24 विमानतळे 15 मेपर्यंत बंद राहणार; केंद्र सरकारचा निर्णय