जम्मूसह काही शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, उरीत गोळीबार, पठाणकोटात ड्रोनची घुसखोरी

जम्मूसह काही शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, उरीत गोळीबार, पठाणकोटात ड्रोनची घुसखोरी

India Pakistan War : भारताच्या कुरापती काढण्याचे पाकिस्तानचे (India Pakistan War) उद्योग सुरुच आहेत. आजही पाकिस्तानने जम्मूसह काही शहरांत हल्ले करण्याचा प्रयत्न केला. नागरी विमानांच्या आडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. जम्मू, पठाणकोट, पोखरण, फिरोजपूर येथे ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. भारताच्या सतर्क असलेल्या यंत्रणेने सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूसह अन्य शहरांतही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट करण्यात आले.

पाकिस्तानने जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात सीमेजवळील परिसरात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. जैसलमेर, बाडमेरमधील उतरलाई, फलौदी आणि पोखरण या ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सगळेच ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. राजस्थानात आतापर्यंत 30 ड्रोन अटॅक झाल्याची माहिती आहे. पंजाबातील गुरदासपूर येथेही ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री 8 वाजल्यानंतर जम्मूत वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. श्रीनगरच्या काही भागातही वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आणि बदामीबाग कँटोन्मेंटजवळून मोठे आवाज ऐकू येत होते असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir Attack) अखनूरमध्येही ब्लॅकआउट केला असून याच दरम्यान दोन पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. पंजाबच्या अमृतसरमध्येही चार ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. येथे एका मागोमाग अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू काश्मीरमधील नगरोटात पाकिस्तानने 15 पेक्षा जास्त मिसाइल डागल्या आहेत. भारतीय सैन्याने (Indian Army) या सगळ्याच मिसाइल हवेतच नष्ट केल्या आहेत. राजौरीजवळ ड्रोन पाडण्यात यश मिळाले. दक्षिण काश्मीरातील (South Kashmir) अवंतीपुरा भागात एक ड्रोन पाडण्यात आले. काश्मीर खोऱ्यात पूर्ण ब्लॅकआउट (Blackout) करण्यात आले आहे.

नागरिकांनो घरातच राहा : ओमर अब्दुल्ला

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील एक्सवर पोस्ट लिहिली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की कृपया पुढील काही तास रस्त्यावर बाहेर पडू नका. घरातच राहा. अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नका. आपण एकत्र मिळून या संकटातून नक्कीच मार्ग काढू असा विश्वास ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube