Download App

India Maldives Conflict : आमच्याकडे भारतीय सैन्य नाहीच; मदत नाकारत मालदीवचा पुन्हा भारतविरोधी सूर

  • Written By: Last Updated:

India Maldives Conflict : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणलेले ( India Maldives Conflict ) असताना आता मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी सुर आळवला आहे. त्यांनी आपल्या देशामध्ये भारताचे लष्कर तैनात नसल्याचा दावा केला आहे.

Mouni Roy : मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, दिलखेच अदांवर चाहते फिदा

दरम्यान दुसरीकडे मालदीव चे अध्यक्ष मोइझु यांनी दोन महिन्यापूर्वीच भारताने 15 मार्चपर्यंत मालदीवमध्ये देण्यात केलेले लष्कर हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर देखील शाहिद यांनी अध्यक्षांना खोटं ठरवलं आहे. तर मालदीवमध्ये भारतीय सैन्य तैनात असण्यामागे मालदीवचे माझे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्या काळातील भारत मालदीव यांच्यातील चांगले संबंध कारणीभूत आहेत.

धक्कादायक! हरियाणात आज्ञातांकडून गोळीबार, INLD च्या प्रदेशाध्यक्षांची हत्या

आपल्या पोस्टमध्ये अब्दुल्ला शाहिद यांनी लिहिले की, शंभर दिवसानंतर हे स्पष्ट आहे की, हजारो भारतीय लष्करी जवानांबाबतच देशाचे अध्यक्ष मोइझु यांचे दावे खोटे आहेत. कारण सरकार सैन्याची संख्या देण्यात असमर्थ आहे. तसेच देशात कोणतेही सशस्त्र परदेशी सैन्य तैनात नाही. त्यामुळे पारदर्शकता महत्त्वाची आहे आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे.

मालदीवच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने मदत केली होती. त्यामध्ये सरकारने मालदीवला डॉर्नियर विमान आणि दोन हेलिकॉप्टर भेट दिले होते. त्यांच्या देखभालीसाठी तब्बल 75 भारतीय सैनिक तैनात करण्यात आले होते. या गोष्टीचा तब्बल एका दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र नुकत्याच पर्यटन क्षेत्र विकासावरून सुरू झालेल्या भारत मालदीव वादामुळे मालदीव सरकारने तेथील भारतीय सैन्य हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी आपल्याकडे कोणतेही परदेशी सैनिक तैनात नसल्याचा दावा करत भारताची मदत आपण घेतली असल्याचं फेटाळून लावला आहे.

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध का ताणले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केल्यापासून (India Maldives Conflict) दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. त्यावरून मोठा वादही सुरू झाला आहे. इंटरनेटवरील चॅटर आणि काही मीडिया रिपोर्ट्सने लक्षद्वीपला मालदीवचा काउंटर म्हणून पर्यटनस्थळ म्हणून प्रचार केला. त्यात भारतीय पर्यटकांनी मालदीव टूरवर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवच्या अर्थव्यवस्थेला झटके बसण्यास सुरुवात झाली.

follow us

वेब स्टोरीज