अमेरिकेत 4,000 कोटी रुपयांचा घोटाळा, भारतीय वंशाचे सीईओ ब्रह्मभट्ट यांच्यावर आरोप

CEO Bankim Brahmbhatt : अमेरिकेतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार, अमेरिकेत तब्बल 4 हजार कोटी

CEO Bankim Brahmbhatt

CEO Bankim Brahmbhatt

CEO Bankim Brahmbhatt : अमेरिकेतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार, अमेरिकेत तब्बल 4 हजार कोटी रुपायांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात भारतीय वंशाचे उद्योगपती बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर 500 दशलक्ष (4 हजार कोटी) कर्जाचा आरोप करण्यात आला आहे.

बनावट ग्राहक खाती तयार करुन आणि बनावट महसूल मिळवून बंकिम ब्रह्मभट्ट (CEO Bankim Brahmbhatt) यांनी अनेक अमेरिकन बँकांकडून (American Bank) मोठी कर्जे मिळवली अशी माहिती सध्या समोर आली आहे.

या प्रकरणात वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार बंकिम ब्रह्मभट्ट यांच्याकडे ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजव्हॉइस नावाच्या कंपन्यांचे मालक आहेत. ब्रह्मभट्ट यांनी अनेक गुंतवणूकदारांना फसवले असल्याचा आरोप आहे. सर्वात प्रमुख गुंतवणूकदारांपैकी, HPS इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स आणि जागतिक मालमत्ता व्यवस्थापन दिग्गज ब्लॅकरॉक यांनीही ब्रह्मभट्ट यांच्या कंपनीत गुंतवणूक केली.

अहवालात असे म्हटले आहे की कर्जदारांनी ऑगस्ट 2024 मध्ये खटला दाखल केला होता. आता असा आरोप आहे की ब्रह्मभट्ट यांनी कर्ज हमी म्हणून अस्तित्वात नसलेले महसूल स्रोत वचन दिले होते. बंकिम ब्रह्मभट्टने त्याच्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये बनावट ग्राहक खाती आणि बनावट पावत्या दाखवून लाखो डॉलर्सचे कर्ज मिळवले.

Maharashtra Election : राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता…

ब्रह्मभट्टने कर्जासाठी या काल्पनिक डेटाचा वापर तारण म्हणून केला. अहवालात असे दिसून आले आहे की बंकिमने अनेक बनावट ग्राहक खात्यांमधून कर्ज घेतले आणि ते निधी भारत आणि मॉरिशससारख्या देशांमध्ये हस्तांतरित केले.

Exit mobile version