Download App

Indian Student Death US : दोन खाजगी स्की वॉटरक्राफ्टच्या धडकेत भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू; फ्लोरिडातील घटना

Indian Student Death US : दोन खाजगी स्की वॉटरक्राफ्टच्या ( Indian Student Death US ) धडक झाल्याने या अपघातामध्ये एका 27 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यामध्ये ही घटना घडली आहे. हा विद्यार्थी तेलंगणामधील आहे. या घटनेनंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सूपुर्द करण्यासाठी पैसे जमा केले जात आहेत.

OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई

हा विद्यार्थी पिटाला इंडियानापोलिसमध्ये इंडियाना यूनिवर्सिटी पर्ड्यू यूनिवर्सिटीमध्ये पदवीचं शिक्षण घेत होता. मे महिन्यामध्ये त्याचं हे शिक्षण पूर्ण होणार होतं. तर मत्स आणि वन्यजीव संरक्षण आयोगाच्या माहितीनुसार तेलंगाणातील के वेंकटरमण पित्तला भाड्याची खाजगी स्की वॉटरक्राफ्ट चालवत होता. त्याच वेळी एका 14 वर्षीय मुलाच्या स्की वॉटरक्राफ्टशी त्याच्या स्की वॉटरक्राफ्टची धडक झाली. त्यामध्ये पित्तलाचा मृत्यू झाला.

उमेदवारी मिळाल्यानं वनवास संपला का? पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनात हूरहूर, राजकारण हा…’

स्की वॉटरक्राफ्ट ही एक वॉटरक्राफ्ट टेंडेम नाव आहे. जी कावासाकी कंपनीने निर्माण केलेलं एक लोकप्रिय मॉडेल आहे. तसेच या घटनेमध्ये या विद्यार्थ्याव्यतिरिक्त कोणी जखमी झालेलं नाही. मात्र या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच यामध्ये स्की वॉटरक्राफ्ट करणारा 14 वर्षीय मुलगा देखील दोषी नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. कारण फ्लोरिडामध्ये 14 वर्षाच्या मुलाला स्की वॉटरक्राफ्ट चालवण्याची परवानगी आहे.

follow us