Indians will have to leave Canada : अमेरिकेनंतर आता भारतीयांना (Indians) कॅनडातूनही (Canada) बाहेर पडावे लागणार आहे. कारण, आता कॅनडा सरकारने (Government of Canada) बाहेरच्या देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमामध्ये मोठे बदल केले आहेत. कॅनडाने त्यांच्या स्थलांतराबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय, याचा थेट विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त कॅनडात गेलेल्यांवर होणार आहे.
मोठी बातमी, भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये शानदार एंट्री !
कॅनडा सरकारच्या नियमांनुसार, कॅनडाचे सीमा अधिकारी कधीही अभ्यास, काम किंवा पर्यटन व्हिसा घेतलेल्यांचा तात्पुरता निवास व्हिसा रद्द करू शकतात. या नवीन नियमांनुसार, सीमा अधिकाऱ्यांचे अधिकार वाढविण्यात आले आहेत. सीमा अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन आणि टेम्पररी रेसिडेंट व्हिसा सारखे तात्पुरते निवासी कागदपत्रे रद्द करण्याचे पूर्वीपेक्षा जास्त अधिकार देतात. दरम्यान, कॅनडा सरकारच्या या नवीन नियमांचा दरवर्षी हजारो परदेशी नागरिकांना परिणाम होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात, “देशभक्तीचे खोटे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे खरे चेहरे उघड
नवीन नियमांतर्गत झालेल्या बदलांचा परिणाम विद्यार्थी, कर्मचारी आणि तात्पुरत्या निवासी अभ्यागतांवर होणार आहे. याचा परिणाम भारतीयांवरही होणार आहे.
कॅनडामध्ये शिक्षण घेणे हे अनेक भारतीयांचे स्वप्न असतं. आणि आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भारतीय मोठ्या संख्येने कॅनडामध्ये जात असतात. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, सुमारे ४,२७,००० भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत. कॅनडामध्ये शिकणाऱ्या ४,२७,००० विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. जानेवारी ते जुलै २०२४ दरम्यान, कॅनडाने भारतीयांना ३,६५,७५० अभ्यागत व्हिसा जारी केले.
फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एखाद्याची मुदत संपल्यानंतर किंवा एखाद्याला प्रशासकीय त्रुटीमुळे कागदपत्रे जारी केले गेले असेल तर सीमा अधिकारी अभ्यास किंवा वर्क परमिट रद्द करू शकतात. नवीन नियमांनुसार, जर व्हिसा धारक कॅनडाचा कायमचा रहिवासी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर परवाना रद्द केला जाऊ शकतो. दरम्यान, २०२४ च्या अखेरीस ओटावाच्या इमिग्रेशन फ्रेमवर्कमध्ये अनेक बदल केल्यानंतर सुधारित नियम अंमलात आणले गेले आहेत.