India’s strategy on Trump’s tariff bomb : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आजपासून म्हणजेच 2 एप्रिलपासून जगभरात टॅरिफ बॉम्ब (Trump’s tariff) टाकणार आहेत. त्याआधी त्यांनी धक्कादायक दावा केलाय, भारत अमेरिकन (America) आयातीवरील शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करेल. हे विधान अशा वेळी आलंय, जेव्हा ट्रम्प अवघ्या 24 तासांत जगासाठी टॅरिफ शुल्क जाहीर करणार आहेत, याचा परिणाम अमेरिकेसह अनेक देशांवर होऊ शकतो.
पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! ‘अबीर गुलाल’ला मनसेचा विरोध; ‘सामना आमच्याशी आहे…’
परंतु डोनाल्ड ट्रम्प बुधवारी जाहीर करणार असलेल्या ‘टॅरिफ शुल्का’बाबत भारताने ‘वेट अॅण्ड वॉच’ अशी रणनीती स्वीकारली आहे. इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत, भारताने संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याचा आणि प्रथम संभाव्य परिणामांचे सखोल विश्लेषण करण्याचा निर्णय घेतलाय. ट्रम्प प्रशासनाकडून आज 2 एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या ‘फ्रीडम डे टॅरिफ’बाबत जागतिक व्यापार जगात खळबळ उडाली आहे. ही महत्त्वाची घोषणा बुधवारी (भारतात गुरुवारी पहाटे) अमेरिकेन वेळेनुसार दुपारी 4 वाजता केली जाईल. ट्रम्प यांनी सोमवारी दावा केला होता की, त्यांच्या धोरणांच्या दबावाखाली भारतासह अनेक देशांना त्यांच्या शुल्कात मोठी कपात करावी लागेल.
भारताचा प्लॅन ए, बी आणि सी…
अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध मजबूत ठेवण्यासाठी भारताने दुचाकी आणि अमेरिकन बर्बन व्हिस्कीसह काही उत्पादनांवरील शुल्क आधीच कमी केलेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताने काही कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याची ऑफर देखील दिली आहे, परंतु त्या बदल्यात अमेरिकेच्या परस्पर करातून सूट देण्याची मागणी केलीय.
कुणाल कामराच्या अडचणीत आणखी वाढ; मुंबई पोलिसांची तिसरी नोटीस धडकली
भारतीय धोरणकर्ते आता ट्रम्पच्या संभाव्य व्यापार धोरणांच्या परिणामांचे विश्लेषण करत आहेत. सोबतच तीन प्रमुख योजनांवर (प्लॅन ए, बी आणि सी) काम करत आहेत.
योजना ए: राजनैतिक चर्चा आणि व्यापार करार
ट्रम्प प्रशासनाशी राजनैतिक संवादाद्वारे व्यापार संबंध राखणे, ही भारताची प्राथमिक रणनीती असेल. भारतीय निर्यातदारांचे नुकसान होऊ नये, म्हणून भारत सरकार अमेरिकेसोबत नवीन व्यापार करारावर वाटाघाटी करू शकते.
योजना बी: निर्यातीचे विविधीकरण
जर ट्रम्प प्रशासनाने भारतीय उत्पादनांवर जास्त शुल्क लादले, तर भारत इतर बाजारपेठांकडे वळू शकतो. युरोप, दक्षिण आशिया आणि लॅटिन अमेरिका यासारख्या नवीन व्यापार भागीदारांसह निर्यात वाढवण्यासाठी एक धोरण आखले जात आहे.
योजना सी: आयातीवरील प्रत्युत्तरात्मक शुल्क
आयात-निर्यात संतुलन राखण्यासाठी भारत अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याचा विचार करू शकतो. यामुळे देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल आणि भारतीय कंपन्यांना स्पर्धात्मक धार मिळेल.
कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होईल?
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा प्रामुख्याने कापड, औषधनिर्माण, आयटी सेवा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. अमेरिका ही भारतीय आयटी आणि औषध उत्पादनांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे, अशा परिस्थितीत सरकार कंपन्यांना धोरणात्मक सवलत देण्याचा विचार करू शकते. अर्थतज्ज्ञ म्हणतात की, जर ट्रम्प प्रशासनाने आयात शुल्क वाढवले तर भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महाग पडू शकते. भारताच्या मजबूत देशांतर्गत मागणीमुळे आणि निर्यात बाजारपेठ वाढविण्याच्या धोरणामुळे हा परिणाम कमी होऊ शकतो. भारत सरकार आता या प्रकरणाचा सखोल विचार करत आहे, कोणत्याही संभाव्य आव्हानासाठी तयार आहे.