Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे.या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक विदेशी नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. युद्धाच्या मैदानातून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. उत्तरी गाझामध्ये जबालिया निर्वासितांच्या शिबिरावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याबाबत इस्त्रायलकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
‘हमास म्हणजे आधुनिक काळातील नाझी, गेल्या 16 वर्षांपासून पॅलेस्टिनींवर अत्याचार’
या हल्ल्यांवर इजिप्तने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे असा आरोप इजिप्तने केला आहे. इस्त्रायल आता निर्वासित छावण्या आणि दवाखान्यांवरही हल्ले करत आहे. त्यामुळे यात आता आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा अशी मागणी इजिप्तने केली आहे. जॉर्डननेही कठोर शब्दांत या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
भारताचं कॅनडाला समर्थन
इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. दुसरीकडे या प्रस्तावाला 120 मतदान झालं ज्यामध्ये 14 मत या प्रस्तावाच्या विरोधात होती. तर 45 देशांची या सभेला हजेरी नव्हती त्यात भारत देखील होता. दरम्यान भारत या सभेला हजर नव्हता याचं कारण सांगण्यात येत आहे की, या प्रस्तामामध्ये हमासने इस्त्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि इंग्लंड हे देश देखील भारताप्रमाणे या मतदानासाठी गैर हजर होते.
हमास सध्याचा नाझी
इस्रायलने हमासवर गंभीर आरोप लावले आहेत. गाझातील हमास हा आधुनिक काळातील नाझी आहे. या दहशतवादी गटाला युद्ध विराम नको आहे. ज्यू लोकांचा नाश करण्यात त्यांना रस आहे.’ असे संयुक्त राष्ट्रात इस्रायलचे स्थायी प्रतिनिधी गिलाड एर्डन यांनी म्हटले. इस्रायल-हमास युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना गिलाड एर्डन म्हणाले की, हमास हा आधुनिक काळातील नाझी आहे. हमास संघर्षावर तोडगा शोधत नाही. त्यांना संभाषणात रस नाही. ज्यू लोकांचा नाश करणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे.
Israel Hamas War : युद्धाचे चटके! साडेसात हजार बळी; हल्ल्यांनी गाझाची चाळण